शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'लोकमत'चा रक्तदान महायज्ञ; राजेश टोपे, नितीन राऊत यांच्या हस्ते 'रक्ताचं नातं' मोहिमेचा प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 2:42 PM

1 / 8
नागपूर/औरंगाबाद : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्रामसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
2 / 8
या महायज्ञाचा प्रारंभ शुक्रवारी नागपुरात सकाळी १०.३० वाजता स्व. जवाहरलाल दर्डा कला अकादमी, ‘लोकमत’ भवन येथे ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाला.
3 / 8
तर औरंगाबाद येथे सकाळी १० वाजता ‘लोकमत’ भवनात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
4 / 8
यावेळी नागपुरात प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, आ. प्रवीण दटके (विधान परिषद सदस्य) उपस्थित होते.
5 / 8
याचबरोबर, आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार उपस्थित होते.
6 / 8
दुसरीकडे, औरंगाबादेत प्रारंभ प्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी हजेरी लावली.
7 / 8
याशिवाय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
8 / 8
दरम्यान, पहिल्याच दिवशी या आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढीnagpurनागपूरAurangabadऔरंगाबादNitin Rautनितीन राऊतVijay Dardaविजय दर्डाRajendra Dardaराजेंद्र दर्डाRajesh Topeराजेश टोपे