सावधान ! तुम्ही तापाने फणफणून जाल; खरूज झालेलं कुत्रं तर जवळ नाही ना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:58 IST2026-02-14T18:20:19+5:302026-02-14T18:58:53+5:30
एकीकडे मानवी वसाहतीत मोकाट श्वानांचा सुळसुळाचा त्रास असतानाच दुसरीकडे श्वानांच्या त्वचारोगाचा गंभीर परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र आहे. खाज, खरुज, दाद, बुरशीजन्य संसर्ग यांसारखे आजार वाढत असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. विशेषतः लहान मूले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या व्यक्तींना अधिक धोका आहे.

भटक्या कुत्र्यांमध्ये सार्केप्टिक मॅन्ज (खरूज) नावाचा आजार सामान्य आहे, जो मानवामध्ये खाज, दाद आणि बुरशीजन्य संसर्गास कारणीभूत ठरू शकतात. कुत्र्यांची विष्ठा आणि लघवीतून लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार पसरू शकतात. ज्यामुळे नागरिकांमध्ये ताप आणि मूत्रपिंडाचे गंभीर विकार होऊ शकतात.

अशी घ्या काळजी - भटक्या श्वानांना थेट स्पर्श टाळावा, मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवावे, संपर्क आल्यास हात स्वच्छ धुवावेत आणि त्वचेविषयक लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, आवश्यक ती नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. असे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे. पाळीय कुत्रे असतील असतील तर ते दाराच्या बाहेरच असावीत, घरात त्यांचा वावर असता कामा नये.

श्वानांच्या अंगावरील केस अन् त्वचेपासून सावधान - तज्ज्ञांच्या माहितीनुसार, श्वानांच्या संपर्कातून काही संसर्गजन्य त्वचारोग माणसांमध्येही पसरण्याची शक्यता असते. परिणामी खाज सुटणे, त्वचेवर लाल पुरळ येणे, दाद किंवा फंगल संसर्गासारख्या समस्या उद्भवतात. सार्वजनिक बागा, शाळांच्या परिसरात किंवा रस्त्यांवर खेळणारी मुले स्वानांच्या संपर्कात येण्याची शक्यता जास्त असते. श्वानांना हात लावल्यास त्यांच्या अंगावरील केस किंवा त्वचेच्या कणांद्वारे संसर्ग पसरू शकतो.

श्वानांच्या त्वचारोगाची कारणं - अपुरा आहार, स्वच्छतेचा अभाव, जंतसंसर्ग, वारंवार होणाऱ्या जखमा, तसेच पशुवैद्यकीय उपचारांचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. पशुप्रेमी हे भटक्या कुत्र्यांना बिस्कीट, बेकरी पदार्थ खायला देतात, त्यामुळे श्वानांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण वाढते व पचनक्रिया बिधड़ते त्यामुळे विविध आजार उद्भवतात.

















