शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'मेनोपॉज क्लिनिक' मध्ये सर्व तपासणी; तसेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीही, कुठे मिळणार उपचार? वाचा पूर्ण स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 20:40 IST

1 / 7
रजोनिवृत्ती ही महिलांच्या शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रिया असली, तरी या काळात अनेक महिलांना विविध त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र सामाजिक संकोच, माहितीचा अभाव आणि दुर्लक्षामुळे अनेकदा या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ही बाब लक्षात घेऊन महिलांना सहज, सुरक्षित व तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे, यासाठी आरोग्य खात्याने ही विशेष योजना सुरू केली आहे.
2 / 7
आरोग्य खात्याचे विशेष 'मेनोपॉज क्लिनिक' - महिलांच्या रजोनिवृत्ती काळातील समस्यांचे निदान व उपचार एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लिनिकमध्ये महिला रुग्णांसाठी विशेष ओपीडी सेवा उपलब्ध राहणार आहे.
3 / 7
या रुग्णालयांत ओपीडी सुरू होणार - जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही विशेष ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांनाही या सेवेचा लाभमिळणार आहे.
4 / 7
'मेनोपॉज' म्हणजे काय? - मेनोपॉज म्हणजे महिलांमध्ये मासिक माळी कायमस्वरूपी बंद होण्याची अवस्था. साधारणतः ४५ ते ५५ वयोगटात ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या बंद पडते. सलग १२ महिने मासिक पाळी न आल्यास रजोनिवृती झाल्याचे मानले आहे. हा टप्पा नैसर्गिक असला, तरी शरीरातील हामर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
5 / 7
हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचीही सुविधा - काही महिलांमध्ये तीव्र हार्मोनल असंतुलन आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देण्याची सुविधाही या क्लिनिकमध्ये उपलब्ध असणार आहे. मात्र, ही उपचारपद्धती प्रत्येक महिलांसाठी आवश्यक असेल असे नाही, याची योग्य वैद्यकीय तपासणीनंतर शिफारस केली जाणार आहे.
6 / 7
औषधोपचार, समुपदेशन आणि मार्गदर्शनही - तपासणीनंतर गरजेनुसार औषधोपचार दिले जाणार असून, मानसिक तणाव, नैराश्य व भावनिक बदलांसाठी समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. तसेच आहार, व्यायाम, योग, जीवनशैलीतील बदल याबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
7 / 7
रजोनिवृत्तीत उद्भवतात या समस्या - मेनोपॉजच्या काळात घाम येणे, झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, चिंता स्मरणशक्ती कमी होणे, सांधेदुखी. वजन वाढणे, हाडे ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरोसिस) तसेच हृदयविकाराचा धोका वाढणे अशा विविध समस्या दिसून येतात. काही महिलांना नैतिक आरोग्याशी संबंधित तक्रारीही जाणवतात.
टॅग्स :Healthआरोग्यwomens healthस्त्रियांचे आरोग्यWomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्र