एका महिन्यात स्वतःमध्ये बदल घडवायचाय?... या गोष्टी करून पाहाच! By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 6:23 PM
1 / 15 बोलण्यावर नियंत्रण ठेवा. समोरच्याला दुखावतील असे शब्द टाळा. नम्रपणे बोला. 2 / 15 'प्रसंगी अखंडित वाचित जावे', असं रामदास स्वामींनी म्हटलंय. त्यांचा हा उपदेश पाळा. तुमच्या आवडीचं काहीही वाचा, पण रोज काहीतरी वाचा! 3 / 15 आपल्या पालकांशी कधीही उद्धटपणे बोलणार नाही, असा मनाशी निश्चय करा. 4 / 15 निसर्ग बरंच काही शिकवत असतो. रोज त्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. 5 / 15 अहंकाराचा वारा लागू देऊ नका. सतत काहीतरी शिकत राहा. 6 / 15 प्रश्न विचारायला लाजू नका. जो प्रश्न विचारत नाही, शंकानिरसन करून घेत नाही, तो कायमच अज्ञानी राहतो. 7 / 15 आयुष्यात जे काम कराल ते झोकून देऊन करा. 8 / 15 नकारात्मकता निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून दोन हात दूरच राहा. 9 / 15 स्वतःची कुणाशीही तुलना करू नका. अन्यथा तुम्हाला तुमची ताकद कधीच कळणार नाही. 10 / 15 प्रयत्न करणं थांबवणं हे सगळ्यात मोठं अपयश आहे, हे पक्कं लक्षात ठेवा. 11 / 15 सतत तक्रारी करत, कुरकुरत बसू नका. 12 / 15 दिवसाचं नियोजन करा. त्यात काही मिनिटं जातील, पण दिवस सत्कारणी लागेल. 13 / 15 रोज काही मिनिटं स्वतःसाठी आणि फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. छंद जोपासा. 14 / 15 एक महिनाभर बाहेरचं खाणार नाही, असा पण करा. पौष्टिक खा, फिट्ट राहा. 15 / 15 आयुष्य छोटं आहे. ते गुंतागुंतीचं करू नका. हसायला विसरू नका. आणखी वाचा