कॅप्टन कोहलीने लॉन्च केला स्वतःचा लाईफस्टाईल ब्रॅण्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 15:31 IST2017-11-10T15:25:18+5:302017-11-10T15:31:49+5:30

मुलांना मैदानात खेळायला प्रवृत्त करण्यासाठी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने स्वतःचा लाईफस्टाईल ब्रॅण्ड लॉन्च केला आहे.
'वन 8' असं विराटच्या नव्या ब्रॅण्डचं नाव असून त्यांचं नवी दिल्लीत लॉन्च करण्यात आलं.
वाढत्या तंत्रज्ञानामुळे मुलं घराबाहेर खेळायला जाणं टाळताना दिसतायेत. त्यामुळे मुलांमध्ये आऊटडोअर गेमची आवड निर्माण करण्यासाठी विराटने ही खास कल्पना तयार केली.
प्रत्येकाने शारीरिकदृष्ट्या फीट राहण महत्त्वाचं असल्याचं विराटने या कार्यक्रमात म्हंटलं.