धर्म-राजसत्तेचा मिलाप, कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची खास क्षणचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 04:49 PM2022-10-06T16:49:09+5:302022-10-06T17:11:14+5:30

आदिशक्ती जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे स्थान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नूषा करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणीनी स्थापन केलेल्या करवीर संस्थानचा शाही दसरा सोहळा देशभर पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने आजवर कधीही झाला नाही असा हा भव्यदिव्य सोहळा कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा अुनभवला. (सर्व छाया-आदित्य वेल्हाळ)

धर्मसत्ता, दैवसत्ता आणि राजसत्तेचा मिलाप असलेल्या या सोहळ्यात सर्वांचे आकर्षण असलेल्या मेबॅक वाहनातून शाहू छत्रपती यांचे आगमन

यंदा उंट, घोड्यांचा सहभाग, नगारे, ढोल ताशांचा गजर, पायलेटींग पोलीसांचे संचलन, एकीकडे पालख्यांची मिरवणूक, देवीची आरती आणि शमी पूजन, असा नेत्रदीपक सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात पार पडला.

सायंकाळी शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन झाले. तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईच्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान झाले. यावेळी पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा शाही दसरा सोहळा निर्बंधमुक्त आणि भव्यदिव्य प्रमाणात साजरा झाला. संस्थानकालीन सोहळ्याच्या अनुभव देणाऱ्या या उत्सवात अंबाबाईच्या भवानी मंडप ते दसरा चौक मार्गावर मिरवणूक काढण्यात आली.

दुसरीकडे न्यू पॅलेसमधून शाहू छत्रपतींचा लवाजमा निघाला, उंट, घोडेस्वार, छत्रपतींच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कलाकार, ढोल, ताशे, नगारे, लेझीम व झांज पथक, पोलीस बँन्ड अशा रंगारंग सोहळ्यांने कोल्हापूर दूमदूमून गेले.