‘तेजाब’मधील ‘मुन्ना’चा व्हीनस कॉर्नरवर दंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 20:01 IST2018-04-08T19:53:42+5:302018-04-08T20:01:25+5:30

भर दुपारच्या टळटळीत उन्हात अनिल कपूरने कोल्हापूरमध्ये ‘तेजाब’मधील मुन्नासारखी एन्ट्री घेतली. त्यानंतर त्याने ‘एक... दोन...तीन...’ गाण्यावर ठेकाही धरला..

चाहत्यांच्या आग्रहानंतर अनिल कपूरने मनसोक्त डान्स केला आणि उपस्थितांची मनं जिंकली.

अनिल कपूरला पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनिल कपूरला कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.

तुमच्या फिटनेसचं रहस्य काय, असा प्रश्न विचारताच, कोल्हापुरी मटण असं उत्तर अनिल कपूरनं दिलं.