पेंटेड स्टॉर्कचा पिलांसोबत दीड महिन्याचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:29 IST2026-03-28T17:22:07+5:302026-03-28T17:29:06+5:30
पक्षिवर्गातील सिकोनिफॉर्मिस गणातील चित्रबलाक अर्थात पेंटेड स्टॉर्क हा सिकोनिडी कुलातील पक्षी असून त्याचे शास्त्रीय नाव मायक्टेरिया ल्युकोसेफेला आहे. आशिया खंडातील हा निवासी पक्षी सहा ते सात वर्षांपूर्वी कोल्हापुरात स्थलांतरित झाला. न्यू पॅलेस परिसरातील तळी, दलदलीच्या जागेत या पक्ष्यांचा कायम वावर आहे. शांत जागी, झाडांच्या उंच टोकावरील घरट्यांमध्ये आपल्या पिलांचे संगोपन नर-मादीचे दोघे मिळून करत आहेत. त्यांचा दीड महिन्यातील पिलासोबतचा हा प्रवास आदित्य वेल्हाळ यांनी टिपला आहे.


कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील झाडावरील घरट्यात पेंटेड स्टॉर्कची ही नर-मादी जोडी पिलाचे संगोपन करत आहे

या घरट्यातील पिलाला पेंटेड स्टॉर्कची ही नर-मादी जोडी खायला घालत आहे

या घरट्यातील पेंटेड स्टॉर्कच्या या पिलाला नर-मादी जोडीने मिळून पिलाला उडण्यासाठी मदत करत आहे.

कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील घरट्यात पेंटेड स्टॉर्कच्या या पिल्याला स्वत:चे खाद्य स्वत: मिळवण्याची शक्ती मिळालेली आहे

















