अभिनेत्रींपेक्षाही हॉट आहे ही योगा टीचर; महिन्याला करते ७३ लाख रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 01:15 PM2021-06-26T13:15:23+5:302021-06-26T13:20:59+5:30

हॉट योगा टीचर एम्बर स्वीटहार्ट आपल्या विद्यार्थ्यांना शारीरिक संबंधाशी निगडीत पोज आणि महिलांना संतुष्ट ठेवण्यासाठी खास आसन शिकवते.

योगाची सुरूवात भारतात झाली असली तरी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योगा देशासोबतच परदेशातही मोठ्या प्रमाणात केला जातो. वेगवेगळ्या आसनांनी केवळ शरीर फिट राहतं असं नाही तर मानसिक आरोग्यही याने चांगलं राहतं. योग साधनेच्या माध्यमातून अनेक लोक लाखोंची कमाई सुद्धा करत आहे. सोशल मीडियावर एक हॉट योगा टीचरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर या योग गुरूची चर्चा जोरदार रंगली आहे. मात्र, ही महिला कोणत्या देशातील आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र, या हॉट योगा टीचरचं नाव एम्बर स्वीटहार्ट असल्याचं समजलं. OnlyFans नावाच्या साइटवर ती लोकांना योगा शिकवते. या महिलेच्या विद्यार्थ्यांमध्ये पुरूषांची संख्य जास्त आहे.

हॉट योगा टीचर एम्बर स्वीटहार्ट आपल्या विद्यार्थ्यांना शारीरिक संबंधाशी निगडीत पोज आणि महिलांना संतुष्ट ठेवण्यासाठी खास आसन शिकवते.

तशी तर एम्बर गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना योगा शिकवते. पण कोरोना संक्रमणादरम्यान तिचं काम बंद पडलं होतं. अशात तिने अॅडल्ट वेबसाइटवर अकाऊंट तयार करून लोकांना आसन शिकवणे सुरू केले होते. यातून ती आता महिन्याला ७३ लाख रूपयांची कमाई करते.

कोरोना महामारीने अनेक लोकांना नवीन सुरूवात करण्याची संधी दिली. एम्बर स्वीटहार्टसाठीही ब्रेक फायद्याचाच ठरला. या अॅडल्ट साइटवर तिचे फॅन्स वाढत आहेत. तिने महिलांसंबंधी शारीरिक संबंधावर फोकस केला आहे. त्यासंबंधी पोजसोबत आपले फोटो शेअर करणं सुरू केलं.