'या' ठिकाणी आहे उकळत्या पाण्याचा तलाव, यात पडून तरुणाची झाली होती अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 08:43 PM2021-08-31T20:43:41+5:302021-08-31T20:47:08+5:30

Thermal Pool America: सरकारनं या तलावाजवळ जाण्यास बंदी घातली आहे.

नवी दिल्ली: उन्हाळ्यात गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण पोहायला जातात. पण, जर तुम्हाला समजलं की, एखाद्या तलावामध्ये उकळतं पाणी आहे, तर तुम्ही त्यात जाणार का ?

अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये असाच एक तलाव आहे. या तलावाचं पाणी लाव्हाप्रमाणं उकळत राहतं आणि त्यात उतरल्यावर मृत्यू होऊ शकतो.

अमेरिकनं सरकारनं या तलावाजवळ जायला बंदी घातलेली आहे. काही दिवसांपूर्वी या तलावाजवळ गेल्यामुळे एका महिलेला तुरुंगाची हवा खावी लागली होती.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही लोक नियम मोडून तलावाजवळ जातात आणि अशा लोकांना पाहून इतर पर्यटकदेखील येथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जाऊ शकतात.

अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या तलावाचं नाव नॉरिस गीझर बेसिन आहे. आतापर्यंत 20 जण यात पडून गंभीररित्या भाजले आहेत.

या तलावात उकळत्या पाण्यासह खूप चिखल असल्यामुळे यात पडलेल्या व्यक्तीला लवकर बाहेर येता येत नाही, आणि त्यात त्याचा मृत्यू होऊ शकतो.

2016 मध्ये कॉलिन स्कॉट या 23 वर्षीय पर्यटकाचा याच तलावात पडून मृत्यू झाला होता. 100 अंश सेल्सिअस गरम पाणी असलेल्या या तलावात पडून कोलिनचे शरीर वितळून गेले होते.