ना कपडे धुवत, ना पाण्याला स्पर्श करत इथे महिला; आयुष्यात केवळ एकदाच आंघोळ करण्याची आहे प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 01:10 PM2022-11-29T13:10:33+5:302022-11-29T13:15:48+5:30

Weird Tradition: आज आम्ही तुम्हाला एका अशा जमातीबाबत सांगणार आहोत ज्यातील महिला आयुष्यात केवळ एकदाच आंघोळ करतात आणि तेही त्यांच्या लग्नाच्या दिवशी.

Weird Tradition: जर तुम्हाला कुणी सांगितलं की, एक महिना तुम्हाला आंघोळ करावीच लागणार नाहीये. तर यासाठी कुणी तयार होणार नाही. पण जगभरात अनेक परंपरा अशा आहेत ज्यांबाबत ऐकल्यावर सगळेच हैराण होतात. जगात अशा अनेक जमाती आहेत जे त्यांच्या परंपरा, रिती-रिवाज आणि नियम आजही काटेकोर पाळतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा जमातीबाबत सांगणार आहोत ज्यातील महिला आयुष्यात केवळ एकदाच आंघोळ करतात आणि तेही त्यांच्या लग्नाच्या दिवशी. बाकी पूर्ण आयुष्य येथील महिला आणि मुली आंघोळ न करताच राहतात.

जगात एक असं ठिकाण आहे जेथील महिला आणि मुली त्यांच्या जीवनात कधीच आंघोळ करत नाहीत. पण तरीही त्यांना सगळ्यात सुंदर मानलं जातं. या ठिकाणच्या महिला त्यांच्या आयुष्यात केवळ एकदाच आंघोळ करतात. हे ऐकून थोडं अजब वाटतं, पण हे खरं आहे.

हा एक असा आदिवासी समाज आहे ज्यात महिला त्यांच्या जीवनात एकदाच आंघोळ करतात. ही परंपरा त्या पाळतात. हिम्बा समाज उत्तर नामीबियामध्ये राहतो. यात जवळपास 50 हजार लोक राहतात. ते राहतात तो भाग आता काकोलॅंड म्हणून ओळखला जातो. हे लोक कुनेन नदीच्या दुसऱ्या बाजूला राहतात.

या समाजातील महिला आंघोळ करण्याऐवजी विशेष जडीबुटींचा वापर करतात आणि याच्या धुराने आपलं शरीर फ्रेश ठेवतात. या जडीबुटीच्या मदतीने त्यांच्या शरीराचा चांगला सुगंध येतो. हा धूर त्यांच्या शरीराला फ्रेश ठेवतो. तसेच कीटाणूही नष्ट करतो.

या महिला लग्न करताना केवळ एकदाच आंघोळ करतात. या महिलांना पाण्याला स्पर्श करण्याचीही मनाई असते. त्यामुळे त्या कपडेही धुवत नाहीत. ही परंपरा अनेक वर्षापासून फॉलो केली जाते.

त्याशिवाय इथे महिला आपल्या शरीरावर प्राण्यांच्या चरबी आणि हेमटिटच्या मिश्रणाने उन्हापासून वाचवण्यासाठी खास लोशनचा वापर करतात. हेमेटाइटमुळे त्यांच्या त्वचेचा रंग लाल होतो. हे खास लोशन त्यांना कीडे चावण्यापासूनही वाचवतं.