एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 05:37 PM2024-05-12T17:37:29+5:302024-05-12T17:38:06+5:30

Mr And Mrs Mahi : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

janhvi kapoor and rajkumar rao mr and mrs mahi movie trailer out watch | एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट या सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. या सिनेमातून राजकुमार राव आणि जान्हवी कपूर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये क्रिकेट वेडं जोडपं दिसत आहे. क्रिकेटर होण्याची इच्छा असलेल्या मिस्टर माहीला वडिलांमुळे त्याच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागतं. पण, त्याची डॉक्टर बायकोही क्रिकेटची चाहती असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. आपलं अधुरं स्वप्न मिस्टर माही बायकोकडून पूर्ण करायचं ठरवतो. आणि मिसेस माहीला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न बघतो. त्याचा हा प्रवास त्याला कुठल्या दिशेकडे घेऊन जातो? मिसेस माहीला क्रिकेटर बनवण्यात तो यशस्वी होतो का? असे अनेक प्रश्न ट्रेलर पाहून पडतात. 

या सिनेमाच्या ट्रेलरने 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या ३१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शरण शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: janhvi kapoor and rajkumar rao mr and mrs mahi movie trailer out watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.