टॉयलेटमधील फ्लशला दोन बटन का असतात? क्वचितच लोकांना माहीत असेल कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:01 PM2021-09-23T15:01:14+5:302021-09-23T15:08:31+5:30

फ्लशला दोन बटन देण्यामागचं कारण क्वचितच कुणाला माहीत असेल. हे दोन बटन का देतात याचं कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही अनेकदा बाथरूममध्ये इंग्लिश टॉयलेट पाहिलं असेल. टॉयलेटच्या फ्लशला अलिकडे दोन बटन येतात. यापैकी एक बटन आकाराने लहान तर दुसरं जरा त्याहून मोठं असतं. प्रत्येक व्यक्ती या दोन्ही बटनांचा वापर करतात. पण फ्लशला दोन बटन देण्यामागचं कारण क्वचितच कुणाला माहीत असेल. हे दोन बटन का देतात याचं कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला दिसलं असेल की, फ्लशमध्ये दोन बटन दिले असतात. एक बटन लहान असतं आणि एक बटन मोठं असतं. पण दोन्ही एकमेकांशी कनेक्ट असतात. दोन्ही फ्लश बटनांमध्ये पाणी सोडण्याची क्षमता ठरलेली असते. मोठ्या फ्लश बटनाने ६ ते ९ लिटर पाणी सोडलं जातं तर छोट्या फ्लश बटनाने ३ ते ४.५ लिटर पाणी सोडलं जातं. म्हणजे मोठ्या बटनाने पाणी जास्त सोडलं जातं.

जेव्हा तुम्हाला टॉयलेट फ्लश करायचं असेल तेव्हा छोट्या बटनाचा वापर केला जातो आणि जेव्हा तुम्हाला सॉलिड वेस्ट फ्लश करायचं असेल तर मोठ्या बटनाचा वापर केला जातो. जेव्हा जास्त वेस्ट मेटरिअल फ्लश करायचं असतं तेव्हा दोन्ही बटन दाबले जातात.

दरम्यान टॉयलेट फ्लशमध्ये लावण्यात आलेल्या मोठ्या बटनाने पाणी जास्त खर्च होतं. तेच तर तुम्ही लहान बटनाचा वापर केला तर कमी खर्च होतं. जर प्रत्येकाने टॉयलेटमध्ये या छोट्या बटनाचा वापर केला तर तर दरवर्षी साधारण २० हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते.

त्यामुळे जर तुम्ही मोठ्या बटनाऐवजी लहान बटनाचा वापर करत असाल तर तुम्ही सहजपणे पाण्याची बचत करू शकाल. आता तुम्हाला या छोट्या बटनाचा फायदा माहीत पडला आहे तर याचा वापर तुम्हीही करा आणि इतरांनाही सांगा.

Read in English