विमानात नेहमीच डाव्या बाजूनेच एन्ट्री का घेतात प्रवासी? अनेकदा पाहिलं असेल पण माहीत नसेल कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:49 IST2026-03-04T15:03:46+5:302026-03-04T15:49:17+5:30
Plane Interesting Facts : विमानात चढण्यासाठी डाव्याच बाजूने पायऱ्या का लावल्या जातात, उजव्या बाजूला का नाही? यामागे एव्हिएशन हिस्ट्री आणि सेफ्टी दोन्ही गोष्टी आहेत. चला जाणून घेऊ यामागची कारणं..

Plane Interesting Facts : आपण कधी प्रत्यक्षात पाहिलं असेल किंवा एखाद्या व्हिडीओत वा सिनेमात पाहिलं असेल की, विमानात चढण्यासाठी पायऱ्या नेहमीच डाव्या साइडनेच लावल्या जातात. विमान कोणत्याही एअरलाईन्स असो किंवा आपण कोणत्याही देशाचा प्रवास करणार असो हा नियम एकसारखाच असतो. पण विमानात चढण्यासाठी डाव्याच बाजूने पायऱ्या का लावल्या जातात, उजव्या बाजूला का नाही? यामागे एव्हिएशन हिस्ट्री आणि सेफ्टी दोन्ही गोष्टी आहेत. चला जाणून घेऊ यामागची कारणं..

व्यवस्थापन सुरळीत होतं
एअरपोर्टवर विमानाच्या आजूबाजूला वेगवेगळ्या गोष्टी सुरू असतात. जसे की, इंधन भरणे, बॅग्स लोड करणे, सफाई करणे आणि टेक्निकल टेस्ट करणे इत्यादी. जर प्रवाशांची विमानात चढण्याची दिशा नेहमीच बदलली तर या सगळ्या प्रक्रियांमध्येही गडबड होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना चढण्यासाठी एक फिक्स दिशा म्हणजे डाव्या बाजूने एन्ट्री ठेवली आहे. जेणेकरून ग्राउंड स्टाफला नेहमी माहीत असावं की, कोणत्या दिशेने प्रवासी येतील आणि कोणत्या बाजूने इतर कामे होतील. याने वेळेची बचतही होते आणि काम वेगानं होतं.

सुरक्षेसंबंधी कारण
विमानाची इंधनाची टाकी आणि काही टेक्नीकल उपकरणं हे उजव्या बाजूने लावलेली असतात. त्यामुळे प्रवाशांना त्या दिशेने चढू देणं घातक ठरू शकतं. कारण इंधन भरताना किंवा उपकरणं चेक करताना कोणतीही चूक झाली तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका वाढतो. डाव्या बाजूने प्रवाशांना विमानात चढवून त्यांना संवेदनशील भागांपासून दूर ठेवलं जातं.

कन्फ्यूजनपासून बचाव
एकदा विमान कंपन्यांनी डाव्या बाजूने एन्ट्रीची पद्धत वापरली, तिच पुढे जगभरात वापरण्यात आली. जर यात काही बदल केला तर याने प्रवासी कन्फ्यूज होतील, सोबतच विमानतळावरील कर्मचाऱ्यांनाही याने असुविधा होईल. त्यामुळे अनेक वर्षांपासून विमानात एन्ट्रीसाठी एकच बाजू वापरली जाते.

समुद्री परंपरेतून मिळाली प्रेरणा
विमान प्रवासाच्या सुरूवातीच्या काळात पायलट्स आणि इंजिनिअर्सनी बऱ्याच गोष्टी समुद्री जहाजातून स्वीकारल्या. समुद्री परंपरेनुसार, जहाजातही प्रवासी डाव्या बाजूनेच एन्ट्री घेतात. जेव्हा विमानं आलीत तेव्हा हीच पद्धत वापरण्यात आली. यामुळे पायलट आणि चालक दलाला एका समान दिशेची समज आली, मग तो समुद्र असो वा आकाश.

कंट्रोल आणि कॉर्डिनेशन
जास्तीत जास्त विमानांमध्ये पायलटची सीट उजव्या बाजूला असते. जुन्या काळात जेव्हा टेक्नॉलॉजी इतकी पुढारलेली नव्हती, तेव्हा पायलट स्वत: प्रवाशांची बोर्डिंग करताना दिसत होते. डाव्या बाजूने बोर्डिंग होत असल्याने त्यांना थेट दृश्य मिळत होतं, ज्यामुळे कॉर्डिनेशन सोपं होत होतं. हीच प्रथा आजही लागू आहे.

















