टेकऑफ आणि लॅंडिंगवेळी हात मांड्यांखाली ठेवून का बसतात एअर होस्टेस? पाहा कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:35 IST2025-08-25T12:58:17+5:302025-08-25T13:35:29+5:30

Airplane Rules : विमानाच्या टेकऑफ आणि लॅंडिंगदरम्यान एअर होस्टेस मांड्यांखाली हात ठेवून का बसतात? पाहा काय असतात कारणं...

Airplane Rules : विमानाचा प्रवास आजकाल भरपूर लोक करतात. अशात आपण कधी विमानानं प्रवास करताना पाहिलं असेल की, विमान टेकऑफ करताना आणि लॅंडिंग करतेवेळी एअर होस्टेस आपल्या सीटवर बसून हात मांड्यांखाली दाबून ठेवतात. पण आपण विचार केलाय का की, एअर होस्टेस असं का करतात? कदाचित याचं उत्तरही अनेकांना माहीत नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

विमानाचं टेकऑफ आणि लॅंडिंग या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या स्टेज असतात. यादरम्यान कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष केलं तर मोठी दुर्घटना होऊ शकते. अशात एअर होस्टेसना यावेळी आपल्या सीटवर बसून सीट बेल्ट बांधण्याचे आदेश असतात. तर मांड्यांखाली हात ठेवण्याचं पहिलं कारण म्हणजे जर विमानाला अचानक झटका लागला किंवा काही घडलं तर त्यांना बॅलन्स कायम ठेवता यावा आणि स्वत:ला सुरक्षित ठेवता यावं.

लॅडिंग होत असताना विमान वेगानं थांबतं, ज्यामुळे शरीरावर अधिक दबाव पडतो. जर एअर होस्टेसनी हात मांड्यांखाली दाबले नाही तर त्या झटका लागल्यावर समोर पडू शकतात. हात मांड्यांखाली ठेवल्यानं बॅलन्स राहतो आणि त्या सीटवर व्यवस्थित बसू शकतात.

टेकऑफ आणि लॅंडिंगदरम्यान काहीही अनुचित घडू शकतं. अशात एअर होस्टेसना लगेच प्रवाशांची मदत करण्यासाठी तयार रहायचं असतं. हात मांड्यांखाली दाबून ठेवल्यानं त्या लवकर उठून अॅक्शन घेऊन शकतात. ही पोजिशन त्यांना स्टेबल राहण्यास मदत करते. जेणेकरून त्या अशा स्थितीसाठी लगेच तयार असाव्यात.

प्रत्येक एअरलाईन्सचे आपले स्वत:चे सेफ्टी प्रोटोकॉल असतात. जे फॉलो करणं एअर होस्टेससाठी गरजेचं असतं. या नियमांनुसार, त्यांना टेकऑफ आणि लॅंडिंगवेळी सीटवर बसून हात मांड्यांखाली दाबून बसावं लागतं.

जास्त वेळ उभे राहिल्यानंतर एअर होस्टेसटच्या पायांमध्ये वेदना आणि थकवा जाणवतो. पायांखाली हात ठेवून बसल्यानं त्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं.

टेकऑफ आणि लॅंडिंगदरम्यान हात पायांखाली दाबून बसण्याचा हा केवळ एक नियम नाही तर सुरक्षा आणि प्रॅक्टिकॅलिटीवर आधारित नियम आहे. यानं प्रवाशांची सुरक्षा होण्यास मदत मिळते आणि काही दुर्घटना झाल्यावर लगेच अॅक्शन घेण्यासही मदत मिळते.