कोणत्या देशातील पुरूष ठेवतात सगळ्यात जास्त पार्टनर? पाहा कोणता देश पुढे आणि भारताचा कोणता नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:46 IST2026-04-03T16:21:13+5:302026-04-03T16:46:14+5:30

Country Men Most Partners : या रिसर्चमधून समोर येतं की, अनेक लोकांचे विचार फारच वेगळे आहेत. चला तर पाहुयाचत कोणत्या देशातील पुरूष जास्त पार्टनर ठेवतात.

Country Men Most Partners : आजकाल रिलेशनशिपबाबत जगभरातील लोकांचे विचार फार बदलत आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांचे पर्सनल रिलेशन, लग्न आणि फिजिकल रिलेशनसंबंधी सवयी सुद्धा वेगवेगळ्या असतात. अलिकडेच करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय रिसर्चमधून समोर आलंय की, कोणत्या देशातील लोकांच्या जीवनात सरासरी किती जास्त पार्टनर असतात.

हा रिपोर्ट World Population Review नुसार तयार करण्यात आलाय. ज्यात ४६ देशांच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं. या रिसर्चमधून समोर येतं की, अनेक लोकांचे विचार फारच वेगळे आहेत. चला तर पाहुयाचत कोणत्या देशातील पुरूष जास्त पार्टनर ठेवतात.

तुर्कीतील पुरूषांचे पार्टनर सगळ्यात जास्त असतात. इथे एका व्यक्तीच्या जीवनात सरासरी १४.५ पार्ट असतात. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (13.3), न्यूझीलँड (13.2), आइसलँड (13.0) आणि दक्षिण आफ्रीका (12.5) सारख्या देशातून येतात. (AI Image)

या देशांतील लोकांमध्ये नात्यांबाबत फारच जास्त मोकळेपणा, पर्सनल फ्रीडम आणि सोशल एक्सेप्टेन्स बघायला मिळतो. ज्यामुळे तिथे सरासरी पार्टनर्सची संख्या जास्त असते.

जास्त पार्टनरच्या या रिपोर्टमध्ये भारत सगळ्यात खाली ४६ व्या नंबरवर आहे. इथे एका व्यक्तीच्या जीवनात सरासरी ३ पार्टनर असतात. याचं मुख्य कारण भारतीय समाजाचे पारंपारिक विचार आणि सांस्कृतिक मान्यता.

अमेरिकेतील लोक सुद्धा अनेकदा नाती आणि पर्सनल लाइफबाबत खुल्या विचाराचे मानले जातात. पण तरी सु्द्धा या जास्त पार्टनरच्या यादीत टॉप १० मध्ये नसून १२ नंबरवर आहे. इथे एका व्यक्तीचे जीवनात सरासरी १०.७ पार्टनर असतात.