अजब ट्रेण्ड! 'या' देशातून अचानक 'गायब' होत आहेत लोक, कारण वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:19 IST2025-07-10T15:53:10+5:302025-07-10T16:19:38+5:30

Johatsu Japanese Culture: जपानमध्ये गेल्या काही वर्षांपासून लोक जोहात्सु बनत आहेत. त्यांना जोहात्सु म्हटलं जातं.

Johatsu Japanese Culture: जपानमधील अनेक लोक आपला परिवार, नोकरी किंवा जगण्याला कंटाळून अचानक 'गायब' होत आहेत. यानंतर ते एक नवीन जीवन सुरू करतात. खास बाब म्हणजे यासाठी काही कंपन्या त्यांची मदतही करतात.

जपानची संस्कृती आणि येथील अनेक रोमांचक गोष्टींची किंवा लोकांच्या अनोख्या लाइफस्टाईलची नेहमीच चर्चा होत असते. येथील अशाच एका खास गोष्टीबाबत आज आपण बघणार आहोत. जपानमध्ये एक शब्द आहे 'जोहात्सु'. याचा अर्थ होतो 'वाफ बनून गायब होणे'. जपानमध्ये गेल्या काही वर्षांपासून लोक जोहात्सु बनत आहेत. त्यांना जोहात्सु म्हटलं जातं. बऱ्याच केसेसमध्ये कुटुंबियांना शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागत नाही.

जोहात्सु बनण्यासाठी काही जपानी कंपन्या लोकांना नवीन जीवन सुरू करण्यासाठी मदत करतात. या कामाला नाइट मुव्हिंग सर्व्हिस म्हटलं जातं. यासाठी कंपन्या लोकांची गुप्त ठिकाणांवर राहण्याची व्यवस्था करतात.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, नाइट मुव्हिंग कंपनीची सुरूवात इथे १९९० दरम्यान शो हतोरी नावाच्या एका व्यक्तीनं केली होती. त्यांचं मत होतं की, बेपत्ता होण्याचं कारण नेहमीच नकारात्मक नसतं. काही लोक नवीन नोकरी आणि लग्नासाठी जोहात्सु बनतात. आधी लोक आर्थिक तंगीमुळे हा निर्णय अधिक घेत होते. पण आता सामाजिक कारणानेही घेतात.

धक्कादायक बाब म्हणजे जपानमध्ये बऱ्याच केसेसमध्ये घटस्फोट होण्याचं कारणही जोहात्सु बनणं आहे. येथील लोक घटस्फोटासाठी कायद्यापेक्षा जास्त गायब होणं अधिक सोयीचं मानतात. आणखी एक बाब म्हणजे इथे पोलिसही बेपत्ता लोकांना तोपर्यंत शोधत नाही, जोपर्यंत त्यांच्यासोबत दुर्घटना किंवा गुन्ह्याचा संशय नसेल.

बीबीसीनुसार, एक महिला कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून १७ वर्षांपासून बेपत्ता आहे. ती इतर लोकांना सुद्धा जोहास्तु होण्यास मदत करते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, एक व्यक्ती घरी असं सांगून निघाला होता की, तो बिझनेस ट्रिपवर जात आहे. पण ती गायब झाली. तो म्हणाला की, त्याला त्याच्या परिवाराची खूप आठवण येते, पण त्याला त्यांच्याकडे जायचं नाही.