रोहितपेक्षा दहापट जास्त विराटची 'ब्रँड व्हॅल्यू'; पाहा, टॉप सेलिब्रिटींची यादी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:55 IST2020-02-06T14:28:21+5:302020-02-06T14:55:25+5:30

देशातील टॉप सेलिब्रेटींच्या ब्रँड व्हॅल्यूत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा बाजी मारली आहे. सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या सेलिब्रिटींमध्ये कोहली टॉप क्रमांकावर आहे. 2019च्या तुलनेत कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 39 टक्क्यांनी वाढली असून त्याची ब्रँड व्हॅल्यू वर्षाला 237.5 मिलियन ( 16,91,36,81,250 भारतीय रकमेत) इतकी झाली आहे. या ब्रँड व्हॅल्यूमध्ये टॉप 20मध्ये केवळ चारच क्रिकेटपटू आहेत. महेंद्रसिंग धोनी ( 41.2 मिलियन) क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक येतो. रोहित शर्मा 20 व्या स्थानावर आहे. टॉप सेलिब्रिटींची नावे पुढील प्रमाणे...
1 - विराट कोहली - 237.5 मिलियन
2 - अक्षय कुमार - 104.5 मिलियन
3 - दीपिका पादुकोन - 93.5 मिलियन
4 - रणवीर सिंग - 93.5 मिलियन
5- शाहरुख खान - 66.1 मिलियन
6 - सलमान खान - 55.7 मिलियन
7 - आलिया भट - 45.8 मिलियन
8 - अमिताभ बच्चन - 42.5 मिलियन
9 - महेंद्रसिंग धोनी - 41.2 मिलियन
10 - आयुषमान खुराणा - 40.3 मिलियन
15 - सचिन तेंडुलकर - 25.1 मिलियन
20 - रोहित शर्मा - 23 मिलियन