Tumor operation girl : अनेक दिवसांपासून १२ वर्षीय चिमुरडीच्या पोटात दुखायचं; डॉक्टरांनी पोटातून काढला २ फुटबॉल एवढा ट्यूमर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 05:34 PM2021-04-07T17:34:19+5:302021-04-07T17:56:58+5:30

Tumor operation girl : सिटी स्कॅन करून पाहिलं तेव्हा कळलं की रुग्णाच्या संपूर्ण शरीरात मोठा ट्यूमर होता. ज्याचा आकार 30x20x14 सेंटीमीटर होता, म्हणजेच दोन मोठ्या फुटबॉलप्रमाणे या ट्यूमरचा आकार होता.

दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमनं एका १२ वर्षीय मुलीच्या पोटातून २ फुटबॉलच्या आकारा एवढा ट्यूमर काढला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून या मुलीच्या पोटात वेदना होत होत्या. हळूहळू पोटाचा आकारही वाढत होता. त्यामुळे या मुलीला श्वास घ्यायला त्रास होत होता.

या मुलींवर उपचार केलेले लेप्रोस्कोपिक आणि बेरिएट्रीक सर्जन डॉक्टर तरूण मित्तल यांनी सांगितले की, जेव्हा ही मुलगी माझ्याकडे उपचार घेण्यास आली तेव्हा तिचं पोट खूपच वाकडं तिकडं होतं. त्यामुळे आम्ही सगळेच हैराण झालो होतो.

सुज आलेली नाही तरीही या मुलीचं पोट एव्हढं फुगलेलं होतं. त्यानंतर आम्ही सिटी स्कॅन करून पाहिलं तेव्हा कळलं की रुग्णाच्या संपूर्ण शरीरात मोठा ट्यूमर होता. ज्याचा आकार 30x20x14 सेंटीमीटर होता, म्हणजेच दोन मोठ्या फुटबॉलप्रमाणे या ट्यूमरचा आकार होता. हा ट्यूमर काढण्यासाठी सर्जरीशिवाय कोणताही दुसरा पर्याय नव्हता.

सर्जरीसाठी सगळ्यात आधी आई वडीलांना बोलावण्यात आले. पूर्ण सावधगिरी बाळगल्यानंतर २५ मार्चला ऑपरेशन करण्यात आलं.

ऑपरेशनदरम्यान पोटात मोठा ट्यूमर दिसून आला. रक्त, नसा आणि शरीराच्या इतर भागांमध्येही हा ट्यूमर वाढत जात होता.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हे ऑपरेशन करणं त्यांच्यासमोर आव्हान होतं.

या ट्यूमरला हिस्टोपॅथोलॉजिकल लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. ऑपरेशननंतर काही दिवसांनी या मुलीला घरी सोडण्यात आलं.