बापरे! नदीकिनारी बछड्यांसह वाघिणीनं गाईची केली शिकार; पाहा भीषण हल्ल्याचे फोटो

By प्रशांत माने | Published: September 1, 2020 08:49 PM2020-09-01T20:49:36+5:302020-09-01T21:06:49+5:30

एखाद्या भूकेलेल्या वाघिणीची किंवा वाघाची अवस्था कशी असते हे तुम्हाला माहिती असेलच. उत्तराखंडच्या रामनगर परिसरात जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एका वाघिणीनं आपल्या तीन बछड्यांसोबत गाईची शिकार केली आहे. वाइल्डलाइफ फोटोग्राफर मुकेश यादव आणि अभिनव मल्होत्रा यांनी हे फोटो शेअर केले आहेत.

व्यवसायाने टूरिज्म गाईड, चाइनीज लॅग्वेज इंटरप्रेटर आणि भटकंती करणारे मुकेश यादव हे फोटोग्राफर आहेत. तर अभिनव हे आयटी सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. मुकेश नेहमी जिम कॉर्बेट भागातील जंगलात वाघ आणि वाघिणींचे फोटो घ्यायला जातात. ३० ऑगस्टच्या सकाळी या दोन्ही फोटोग्राफरर्सना हा अद्भूत नजारा पाहायला मिळाला आहे. हे दूर्मीळ दृश्य त्यांनी आपल्या कॅमेरात कैद केलं आहे.

३० ऑगस्टला वाघिण आपल्या बछड्यांसह रामनगरच्या मागिल बाजूस टेढा गावात आली होती. दरम्यान नदीकाठी वाघिणीला गाय दिसली. आपल्या बछड्यांनी गाईला सर्व बाजूंनी घेरल्यानंतर गाईची शिकार केली आहे.

स्थानिक लोक या वाघिणीला कनकटी म्हणतात. कारण या वाघिणीचा एक कान कापलेला आहे. चेहरा आणि नाकावर खूप जखमा आहेत. तरीसुद्धा एका वाघाला टक्कर देऊ शकेल इतकी बलाढ्य ही वाघिण आहे.

या वाघिणीचे बछडे १४ महिन्यांचे आहेत. त्यांना रोज जेवण मिळावं म्हणून ही वाघिण शिकाराच्या शोधात असते.

मुकेश आणि अभिनव या वाघिणीच्या मागावर गेल्या एका महिन्यापासून होते. मुकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणच्याही जंगलात अशी दूर्मीळ दृश्य दिसण कठीण असतं.

गाईची शिकार केल्यानंतर वाघिणीनं आपलं पोट भरलं आणि जंगलात निघून गेली.

वाघिणी शिकाराचे मास खाण्यासाठी पुन्हा त्यात ठिकाणी येते. स्थानिक लोक या शिकाराला हात लावत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाघांची संख्या जास्त आहे. (Image credit- Abhinav Malhotra, Mukesh Yadav, aajtak)