'सेल्फी विथ मोदी'; 'तारक मेहता...'मधील कलाकारने साकारला मोदींचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:19 PM2019-04-17T16:19:39+5:302019-04-17T17:21:07+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी एक नवी शक्कल लढविली आहे. राजकोटमध्ये आयोजित केलेल्या युवा मोर्चा सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा साकारण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या अनोख्या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे 'तारक मेहता का उलटा चश्मा' मालिकेतील एका कलाकाराने साकारला आहे. या मालिकेतील सुंदरलाल म्हणजेच मयूर वकानी या कलाकारने नरेंद्र मोदींचा पुतळा बनविला आहे.

मयूर वकानी यांनी नरेंद्र मोदींचा हा पुतळा चक्क बारा दिवसांच्या कालावधीत तयार करण्यात आला आहे. फायबर ग्लासच्या मदतीने हा पुतळा साकारण्यात आला आहे.

मतदारांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी नरेंद्र मोदींचा हा पुतळा राजकोट मधील आत्मीय महाविद्यालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नरेंद्र मोदींचा पुतळा राजकोटच्या सर्व तरूणांना आकर्षित करत आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपाकडून 'सेल्फी विथ मोदी' अशी प्रचाराची रणनिती सुरु केल्याचे बोलले जात आहे.

राजकोटच्या स्वामीनारायण मंदिरात आयोजित केलेल्या युवा मोर्चा सम्मेलनात चक्क एका दिवसात 1 हजार 500 लोकांनी नरेंद्र मोदींच्या पुतळ्यासोबत सेल्फी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.