काय खाणार? रेस्टॉरंटमध्ये रोबो विचारतायत हा प्रश्न, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:19 PM2021-08-01T17:19:21+5:302021-08-01T17:44:23+5:30

कोरोनाकाळातील लॉकडाऊनने हॉटेलव्यवसायिकांच्या व्यवसायाचे बारा वाजवले होते. अजूनही कोरोनाच थैमान सुरुच आहे. अशावेळी हॉटेल्समध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळायचं कसं? एका हॉटेलचालकानं यावर लढवली नामी शक्कल...

जगभरात कोरोनाचं संकट असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यावश्यक आहे. इतर अनेक ठिकाणी ते पाळलं जाईल, मात्र रेस्टॉरंटमध्ये ते कसं पाळायचं, हा प्रश्नच आहे.

या प्रश्नावर एक जालीम उत्तर सापडलं आहे. आता वेटरचं काम करणार आहेत ते रोबो.

आंध्र प्रदेशातील एका रेस्टॉरंटनं हे रोबो आणले आहेत. हे रोबो ग्राहकांकडून ऑर्डर घेण्याचं आणि तयार झालेली ऑर्डर ग्राहकांना देण्याचं काम करतात.

वेटरच्या रुपात असलेल्या रोबोला ऑर्डर देणं नागरिकांना थोडं विचित्र वाटतंय.

पण सोशल डिस्टन्सिंग राखण्याासाठी या पर्यायाला चांगलीच पसंती मिळत आहे.

या हॉटेलमध्ये सध्या लोकं येत आहेत, ऑर्डर देत आहेत आणि चमचमीत पदार्थांवर तावही मारत आहेत.

अशा प्रकारची सर्व्हिस ग्राहकांना सुरक्षित वाटत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासन या हॉटेलमधील गर्दी वाढत असल्याचं चित्र आहे.

रोबो सध्या वेटरचं काम करत असल्याची माहिती हॉटेलचे मॅनेजर नागेश यांनी सांगितलं आहे.

हे रोबो पूर्णतः स्वयंचलित असून ऑर्डर स्विकारण्याचं आणि पोहोचवण्याचं काम ते स्वतःच करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हे रेस्टॉरंट आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील आहे.