'मर्द' बनण्यासाठी पुरूषांना इथे नको नको ते करावं लागतं, विश्वासही बसणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 04:37 PM2019-12-12T16:37:58+5:302019-12-12T16:41:14+5:30

प्रत्येक समाजात वेगवेगळ्या प्रथा, संस्कृती असतात. हेच त्यांचं वेगळेपण असतं. आजही अनेक आदिवासी समाजात किंवा ग्रामीण भागांमध्ये अनेक अनोख्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात. त्यातील काही फारच विचित्र आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत. आता हीच प्रथा बघा ना...जगातल्या काही आदिवासी समाजात पुरूषांना ते 'मर्द' असल्याचं सिद्ध करण्यासाठी नको नको त्या गोष्टी कराव्या लागतात.

१) केनियातील मसाई या आदिवासी जमातील पुरूषांना पुरूषत्व सिद्ध करण्यासाठी सिंहाची शिकार करावी लागते. पूर्वी एकटं जाऊन त्यांना शिकार करावी लागायची. पण बदलत्या काळात प्रथा जरा बदलली आहे. तसेच सिंहांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे आता सिंहाची शिकार करण्यासाठी तरूणांची टोळी जाते. यात अट ही असते की, जखमी किंवा दुबळ्या सिंहाची शिकार करू नये. मादेची शिकारही चालत नाही. (Image Credit : Social Media)

२) हवाईतील एका आदिवासी जमातीतील मुलांना त्यांचं पुरूषत्व सिद्ध करण्यासाठी उंच ठिकाणाहून समुद्रात उडी मारावी लागते. याचा अर्थ लहानपण विसरून तुम्ही आता पुरूष झालात असा होतो.

३) भारतातल्या झारखंड येथील आदिवासी जमातींमध्येही एक अनोखी प्रथा आहे. येथील मुंडा, सांथाल, हो, भूमीज, आरोओन आणि खरीया जमातीतील मुलांना वार्षिक शिकार उत्सवात सहभाग घ्यावा लागतो. असं केलं नाही तर तो मुलगा अजून लहानच असल्याचं समजलं जातं. (Image Credit : Social Media)

४) ऑस्ट्रेलियातील Aborigini या आदिवासी जमातीतील मुलांना पुरूषत्व सिद्ध करण्यासाठी आध्यात्माच्या मार्गवर चालावं लागतं. यानुसार त्यांना ६ महिने जंगलात एकांतवासात जावं लागतं. हा ६ महिन्यांचा कालावधी पूर्ण करून परतल्यावरच त्यांना समुहात घेतलं जातं.

५) ऑस्ट्रेलियातीलच Unambal नावाच्या एका आदिवासी जमातीतील मुलांना पुरूषत्त्व सिद्ध करण्यासाठी असह्य शारीरिक वेदनांचा सामना करावा लागतो. यात त्यांच्या छातीवरी, हातावरील आणि खांद्यावरील त्वचा कापली जाते. त्या जखमेत माती भरली जाते. त्यानंतर त्यांना मर्द मानलं जातं.

६) ब्राझीलमधील एका आदिवासी जमातीत मुलांना मुंग्या ठेवलेले हातमोजे घालायला दिले जातात. या मुंग्या चावल्यावर असह्य वेदना होतात. हे हातमोजे १० मिनिटे त्यांना घालावी लागतात आणि तेही न रडता किंवा ओरडता.

७) Ethiopia येथील Hamar जमातीतील मुलांना निर्वस्त्र होऊन रांगेत लावलेल्या गायींवरून उडी मारावी लागते. असं त्यांना एकदा नाही तर चारदा करावं लागतं. तेव्हा ते पुरूषत्त्व सिद्ध करू शकतात. यामागे असा समज आहे की, यातून मुलांची शारीरिक क्षमता कळून येते.