शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्यांदा जोडीदाराला Kiss केल्यानंतर प्रत्येक मुलीच्या मनात येणारे प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 1:54 PM

1 / 6
पहिला रोमान्स आणि पहिला किस (चुंबण) प्रत्येकासाठी खूप विशेष आहे, यात काही शंका नाही. आपल्या जोडीदाराला मिठी मारणे- त्याच्या कपाळावर किस करणे किंवा त्याच्या गालांना प्रेमाने स्पर्श केल्याने फक्त नात्यामध्ये गोडपणा येते नाही, तर जोडप्यांना सुद्धा यावेळी एकमेकांच्या जवळ असल्यासारखे वाटते.
2 / 6
दरम्यान, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि नात्यांमधील प्रेम कायम टिकवून ठेवण्यासाठी इंटिमेसी खूप महत्वाचे आहे. मात्र, मजेशीर गोष्ट अशी की जेव्हा मुली पहिल्यांदा आपल्या जोडीदाराचा किस घेतात, तेव्हा अशा बर्‍याच गोष्टी त्यांच्या मनात येतात, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही.
3 / 6
पहिल्यांदा किस घेणारी प्रत्येक मुलगी या परिस्थितीतून जाते. जेव्हा ती तिच्या जोडीदाराला किस करते, तेव्हा तिच्या मनात सर्वात आधी प्रश्न येतो की, माझे दात त्याला लागले नाहीत ना?, तसे झाल्यास तो माझ्याबद्दल काय विचार करेल? मात्र, हा तो क्षण आहे जेव्हा जोडप्यांना सर्वकाही विसरून या सुंदर भावनेत हरवायचे असते.
4 / 6
पहिल्या किसच्या वेळी केवळ मुलीच नव्हे तर मुलेही खूप चिंताग्रस्त असतात, यात शंका नाही. त्यांच्या मनातही अशा बर्‍याच गोष्टी चालू असातात, ज्या कोणालाही त्रास देऊ शकतात, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे तोंडाला वास येणे ही समस्या आहे, जी कधीकधी चांगले संबंध वाईट करू शकते. मात्र, अशा वेळी प्रत्येक जोडप्याने माउथ फ्रेशनर वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून पहिल्या किस दरम्यान आपली छाप खूपच प्रबळ ठरेल.
5 / 6
किस नात्याला पुढे नेण्याचेही काम करते. तुम्ही दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखत असलात, तरीही जर तुमच्या नात्यात जवळचा संबंध नसेल तर तुम्हाला एकमेकासोबत कम्फर्टेबल वाटणार नाही. दोघांचे संबंध मजबूत झाल्यानंतर, तुम्हा दोघांनाही पुन्हा पुन्हा एकमेकांना किस घ्यायचा आहे, असे होऊ शकते. परंतु सत्य हे आहे की पहिला किस थोडा वेगळा असतो.
6 / 6
दरम्यान, हे देखील खरे आहे की प्रत्येक मुलीला किस घेतल्यानंतर असे वाटते की, तिच्याबद्दल त्याच्या भावना (फिलिंग्स) कशा आहेत? तो बदलणार तर नाही ना? मी त्याच्याशी बोलू का?... बरं, मुलींनी हे समजलं पाहिजे की एका चुंबनानंतर काहीही बदलणार नाही. आपलं नातं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला दोघांनीही शहाणपणाने वागावे लागेल.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपJara hatkeजरा हटके