Join us  

लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा कोलकाताच्या दिशेने प्रवास काही सोपा राहिला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 3:42 PM

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा कोलकाताच्या दिशेने प्रवास काही सोपा राहिला नाही. लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर कोलकाताच्या दिशेनं निघालंले त्यांचं खाजगी विमान खराब हवामानामुळे गुवाहाटीला वळवले गेले. त्यानंतर मध्यरात्री ते पुन्हा गुवाहाटीवरून कोलकाताच्या दिशेने गेले, परंतु पुन्हा खराब हवामानामुळे त्यांना लँडिंगची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मध्यरात्री ३ वाजता त्यांना गुवाहाटीवरून वाराणसी येथे विमान उतरावे लागले. त्यामुळे त्यांचा मुक्काम तिथेच होता आणि मिळालेल्या संधीचं सोनं साधताना KKR च्या सर्व सदस्यांनी वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदीरात जाऊन दर्शन घेतले. अखेर दुपारचं विमान पकडून संघ कोलकाता येथे दाखल झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने दणदणीत विजयाची नोंद करताना गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना KKR ने ९८ धावांनी जिंकला. कोलकाताच्या ६ बाद २३६ धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ १६.१ षटकांत १३७ धावांत तंबूत परतला. या सामन्यानंतर कोलकाताचा संघ पुढील सामना घरच्या मैदानावर ११ मे रोजी घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यासाठी ते लखनौवरून चार्टर्ड फ्लाईटने कोलकाताच्या दिशेने निघाले, परंतु त्यांच्या विमानाला तिथे लँडिंगची परवानगी नाकारली गेली आणि विमान गुवाहाटीकडे वळवले गेले. 

 कोलकात्यावरील खराब हवामानामुळे KKRचे चार्टर्ड फ्लाईट गुवाहाटीकडे वळवण्यात आले होते आणि संघ तिथे दाखल झाला होता. पण, काही तासानंतर त्यांना कोलकाता येथे उतरण्यास परवानगी मिळाली आणि ते गुवाहाटी येथून निघाले होते. साधारण रात्री ११ वाजता ते कोलकाता येथे पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एकदा त्यांच्या विमानाची दिशा बदलावी लागली आणि ते वाराणसी विमानतळावर उतरले.  

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सवाराणसीऑफ द फिल्ड