पवित्र डोंगरावर कपलने शूट केला Adult Video, पोलीस घेताहेत त्यांचा जागोजागी शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 11:16 IST2021-04-29T11:12:12+5:302021-04-29T11:16:58+5:30
हा व्हिडीओ भलेही काही महिन्यांपूर्वी शूट केला असेल पण या व्हिडीओवरून गेल्या काही दिवसांपासून बालीमध्ये वाद पेटला आहे. याच कारणाने इंडोनेशियातील पोलीस कपलचा तपास घेत आहेत.

रशियातील पॉर्न स्टार वेरोनिका त्रोशीना इंडोनेशियात एक अॅडल्ट व्हिडीओ शूट करून अडचणीत आली आहे. २२ वर्षीय ही स्टार तिच्या पार्टनरसोबत बाली बेटावर हजर होती. त्यांनी बेटावरील एका पवित्र डोंगरावर हा प्रायव्हेट व्हिडीओ शूट केला होता. आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हे कपल रशियातील राजधानी मॉस्कोपासून साधारण १६५ मैल अंतरावर राहतं. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ या कपलने काही महिन्यांपूर्वी शूट केला होता आणि वेरोनिका त्रोशीना नावाच्या या पॉर्न स्टारने या व्हिडीओला तिच्या ट्विटर अकाउंटवरूनही प्रोमोट केलं होतं.

रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ माउंट बाटूरमध्ये शूट करण्यात आला आहे. हा डोंगर पवित्र डोंगर म्हणूनही ओळखला जातो. इथे पुरा बाटूर नावाचं एक लोकप्रिय मंदिरही आहे. इथे अनेक भाविक भेट देत असतात.

हा व्हिडीओ भलेही काही महिन्यांपूर्वी शूट केला असेल पण या व्हिडीओवरून गेल्या काही दिवसांपासून बालीमध्ये वाद पेटला आहे. याच कारणाने इंडोनेशियातील पोलीस कपलचा तपास घेत आहेत.

पोलीस या प्रकणावर इमीग्रेशनच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहे. तसेच हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, कपल अजूनही इंडोनेशियात आहे की निघून गेलंय. पोलिसांना लोकेशन मिळालं असून हे लोकेशन Pasar Agung मंदिरापासून काही अंतरावर आहे.

यांची पॉर्न फिल्म समोर आल्यावर एकच गोंधळ उडाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जर हे कपल पकडलं जाईल तर त्यांना दोन वर्षे किंवा आठ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, रशियन कपलने यावर अजून काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान २०१७ मध्ये वेरोनिकाने ग्रॅज्युएशन केलं होतं. या पॉर्न स्टारसोबत तिचा पार्टनरही पोहोचला होता. त्याचं नाव मिखाएल मोरोजोव असं आहे. सोशल मीडियावर ते नेहमीच त्यांचे फोटो शेअर करतात.



















