1000हून अधिक च्युइंगमवर दिसतेय ही व्यक्ती, लोकांनी च्युइंगम मॅनची दिली उपाधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 03:50 PM2020-02-15T15:50:56+5:302020-02-15T15:53:43+5:30

च्युइंगमला चावून झाल्यानंतर आपण फेकून देतो. परंतु एका व्यक्तीनं च्युइंगमवर कलाकारी साकारली आहे.

लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या बेन विल्सननं लोकांनी थुंकलेल्या च्युइंगमवर आपली कलाकारी दाखवली आहे.

57 वर्षांचे बेन विल्सन गेल्या 15 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन च्युइंगमला एकत्र करत आहेत.

मला पुनर्प्रक्रिया करण्याचा छंद असल्यानं असं करत असल्याचं विल्सन म्हणाले आहेत. च्युइंगम चावून झाल्यानंतर लोक थुंकून टाकतात, मी त्यांना एकत्र करून त्यावर कलाकुसर करतो.

च्युइंगम करण्यात आलेली कलासुद्धा पुनर्प्रक्रियेचा एक भाग आहे. लंडनमधल्या थेम्स नदीजवळ बसून कलाकारी करतात.

वेल्सन हे उत्तरी लंडनमध्ये वास्तव्याला आहेत. यापूर्वी त्यांनी लाकडावर आपली कलाकुसर दाखवली होती. आतापर्यंत ते च्युइंगमवर नक्षीकाम करत आहेत.