शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

एक अशी रेल्वे ज्यात ऑक्सीजन मास्कशिवाय प्रवास करणं अवघड, हजारो किमीचा अद्भुत प्रवास फक्त २१२ रूपयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:40 IST

1 / 6
Train Interesting Facts : आपल्याला माहीत आहेच की, विमानात जर काही दुर्घटना घडली तर ऑक्सीजन मास्कची व्यवस्था केलेली असते. रेल्वेत ऑक्सीजन मास्कची गरज पडत नाही. पण आपल्याला वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल की, एका रेल्वेने प्रवास करण्यासाठी आपल्याला तिकीटासोबतच ऑक्सीजन मास्कची सु्द्धा गरज पडेल. एक असा रेल्वे प्रवास आहे, जो करताना प्रवाशांना ऑक्सीजन मास्क, सिलेंडरची गरज पडते. इतकंच नाही तर रेल्वे दवाखान्यासारखी व्यवस्थाही असते. हा प्रवास करण्यासाठी आपल्याला तिकीटाच्या किंमतीपेक्षा हिंमतीची गरज अधिक पडते.
2 / 6
आपल्याला कल्पना नसेल की, जगातील सगळ्यात उंच रेल्वे प्रवास किंगहाय-तिबेट रेल्वे लाइनवर होतो. इते रेल्वे ४ हजार मीटर म्हणजे साधारण १३१३२ फूट उंचावर धावते. १९५६ किलोमीटर लांब पल्ल्याच्या या प्रवासात सगळ्यात टॉपची उंची समुद्र सपाटीपासून ५०७२ मीटर म्हणजे १६६४० फूट इतकी आहे. Tanggula Pass जवळ तर रेल्वे आकाशात उडत असल्यासारखी भासते. हा प्रवास पूर्ण करण्यास साधारण २० ते २२ तासांचा वेळ लागतो.
3 / 6
१६६४० फूट उंचीवर ऑक्सीजन जमिनीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी होतं. या लाइनवर प्रवास करणं जेवढं रोमांचक असतं, तेवढंच खतरनाकही असतं. प्रवासादरम्यान प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून दोन ऑक्सीजन सिस्टीम लावलेले असतात. या ऑक्सीजन सिस्टीमच्या मदतीने रेल्वेत ऑक्सीजनचं प्रमाण बाहेरच्या वातावरणापेक्षा २३ टक्क्यांनी वाढवलं जात. तसेच जेव्हा रेल्वे सगळ्यात जास्त उंचीवर पोहोचते, तेव्हा सीटवर लावलेले ऑक्सीजन मास्क आपोआप उघडतात.
4 / 6
ऑक्सीजन लेव्हलची समस्या असलेल्या या प्रवासादरम्यान प्रवासी निसर्गाच्या खऱ्या सौंदर्याचा आनंद घेतात. Qinghai-Tibet train बीजिंग, शांघाय, चेंगुई, शिनिंग ते तिबेटच्या बर्फाळ डोंगरांमधून धावते. अंदाज लावू शकता की, हा अनुभव किती वेगळा ठरत असेल.
5 / 6
अनेकांना वाटत असेल की, हा अद्भुत प्रवास करण्यासाठी आपल्याला लाखो रूपये खर्च करावे लागतील. पण असं काही नाहीये. या रेल्वेत तीन प्रकारच्या सीट आहेत. सॉफ्ट स्लीपर सीट सगळ्यात आरामदायक असते. याच्या प्रत्येक कॅबिनमध्ये ४ बर्थ असतात. कोचमध्ये टेबल, टीव्ही स्क्रीन, लगेज स्पेस आणि ऑक्सीजन आउटलेट असतात.
6 / 6
जर आपण या कोचमध्ये तिकीट बुक कराल तर आपल्याला ६७५ रूपये खर्च करावे लागतील. जर आपण हार्ड स्लीपर कोचमध्ये तिकीट बुक करत असाल तर आपल्याला ४२५ रूपये खर्च करावे लागतील. तर हार्ड सीटचं तिकीट सगळ्यात स्वस्त असतं. यासाठी केवळ २१२ रूपये खर्च करावे लागतील.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके