जगातलं सगळ्यात महागडं जेल, इथे एका कैद्यावर केला जाणारा खर्च वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 03:42 PM2020-02-29T15:42:18+5:302020-02-29T16:02:48+5:30

जगातलं सगळ्यात महागडं जेल म्हणून 'ग्वांतानमो बे जेल' प्रसिद्ध आहे. कुख्यात कैद्यांसाठी असलेलं हे क्यूबा जेल 'ग्वांतानमो च्या खाड़ीत आहे. म्हणूनच या जेलचं नाव ग्वांतानमो बे जेल' असं ठेवण्यात आलं.

अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या जेलमध्ये जवळपास ४० कैदी आहेत. एका कैद्यावर वर्षभरात जवळपास ९४ कोटी रुपये खर्च केले जातात. तुमचा वाचून विश्वास बसणार नाही पण या तुरूंगात १८०० सैनिक तैनात आहेत.

या जेलमध्ये एका कैद्यांवर सुमारे ४५ सैनिकांचा पहारा असतो. या सैनिकांना दर वर्षी ५४० मिलियन डॉलर खर्च केला जातो. तुम्ही विचार करत असाल की या जेलमध्ये असं काय आहे. ज्यामुळे एवढा खर्च केला जातो.

या जेलमध्ये फक्त अशा कैद्यांना ठेवलं आहे जे खूपचं भयावह आहेत. या जेलमध्ये एकूण ३ इमारती, २ मुख्यालयं आणि ३ हॉस्पीटल्स आहेत. या व्यतिरिक्त वेगवेगळे कंपाऊंड सुद्धा तयार केले आहेत. कारण यामुळे कैद्यांना आपापल्या वकिलाशी चर्चा करता येईल. या जेलमध्ये कैद्यांसाठी चर्च आणि सिनेमा हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.

अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड खालिद मोहाम्मद सुद्धा याच जेलमध्ये बंद आहे. क्यूबामधिल दक्षिणपूर्वला१८९८ मध्ये ग्वांतानमो बेस तयार करण्यात आला.

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या ठिकाणी कम्पाऊंड तयार केलं आहे. याला कॅम्प एक्सरेचं नाव देण्यात आलं आहे.

या जेलचे कॅप्टन आणि वकिल ब्रायन एल माईजरच म्हणणं असं आहे की या जेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ७७० पुरूष राहत आहेत. २००३ मध्ये कैद्यांची संख्या ६७७ पर्यंत पोहोचली.

जेव्हा २०११ मध्ये शेवटचं या ठिकाणी कोणत्यातरी कैद्याला या ठिकाणी आणण्यात आलं होतं. पूर्व अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात ५४० कैद्यांची सुटका करण्यात आली होती.

ओबामा यांच्या काळात पूर्व अमेरिकी २०० कैद्यांची मुक्तता करण्यात आली.