शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो! NASA ला अंतराळात सापडला मोठा खजिना, प्रत्येक व्यक्ती होईल अब्जाधीश इतकी आहे किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 12:02 PM

1 / 10
कधी कधी वैज्ञानिकांना अंतराळात अशा काही गोष्टी सापडतात की, याने जगभरातील लोक हैराण होतात. अशीच एक आश्चर्यकारक गोष्ट अमेरिकीतील अंतराळ एजन्सी नासाला सापडली आहे.
2 / 10
'द सन' या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, नासाला अंतराळात एक फार मोठा खजिना सापडलाय. ज्याबाबत असे सांगितले जात आहे की, याची किंमत इतकी आहे की, पृथ्वीवरील सर्वच लोकांमध्ये वाटली गेली तर प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होऊ शकतो.
3 / 10
नासाला अंतराळात मोठ्या प्रमाणात एक लोखंडाचा भांडार सापडला आहे. मुळात हा एक क्षुद्रग्रह म्हणजेच छोटा तारा आहे. ज्याला १६ सायकी (16 Psyche) असं नाव देण्यात आलंय.
4 / 10
साधारण १२० मैल रूंद हा तारा पूर्णपणे लोखंडापासून तयार झालेला आहे. इतकेच नाही तर यात सोनं, प्लॅटिनम आणि निकेलही मोठ्या प्रमाणात आहे.
5 / 10
नासाच्या अंदाजानुसार, या क्षुद्रग्रहावर असलेल्या धातुची किंमत साधारण ८००० क्वॉड्रिलियन पाउंड इतकी असेल. क्वॉड्रिलियन समजण्यासाठी तुम्हाला ८००० नंतर पुढे १५ शून्य लावावे लागतील.
6 / 10
अंदाज असा आहे की, जर जगभरातील ८ अब्ज लोकांमध्ये वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला ९५०० कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम येईल.
7 / 10
नासानुसार, हा छोटा तारा पृथ्वीपासून २४ अब्ज मैल दूर आहे. म्हणजे तिथे एखाद्या अंतराळ यानाला पोहोचण्यासाठी साधारण चार वर्षे लागतील. हा तारा मंगळ आणि बुध यांच्या मध्ये प्रदक्षिणा घालत आहे.
8 / 10
नासाने असेही सांगितले की, या अद्वितीय अशा आणि धातुसमृद्ध क्षुद्रग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी योजना आखली जाईल. ही योजना स्पेस एक्सच्या मदतीने केली जाईल. जर सगळंकाही ठिक झालं तर हे मिशन २०२२ मध्ये सुरू होईल.
9 / 10
एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी सांगितले की, सायको १६ हा क्षुद्रग्रहाला १८५२ मध्ये इटलीचे खगोलशास्त्रज्ञ एनीबेल डी गॅस्परिस यांनी शोधला. त्यांनी त्याचं नाव आत्म्याची प्राचीन ग्रीक देवीच्या नावावरून ठेवलं होतं.
10 / 10
स्पेस एक्सचा मुख्य एलन मास्क या ताऱ्याजवळ जाण्यासाठी योजना आखत आहेत.
टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके