रहस्यमय! 'या' ठिकाणी आहे 'नरकाचे द्वार'; इथे एकदा माणूस आत गेला तर तो कधीही परतत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 07:52 PM2019-12-17T19:52:30+5:302019-12-17T19:56:40+5:30

जगात बरेच ठिकाण असे आहेत, जे काही कारणास्तव रहस्यमय राहतात. अशीच एक जागा तुर्कीच्या प्राचीन हेरापोलिस शहरात आहे, तिथे एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे. या मंदिराबाबत म्हटलं जातं की, हे नरकाचं द्वार आहे, ज्यामध्ये तुम्ही आतमध्ये नाही तर जवळ जाणाराही कधीही परतला नाही.

सांगितलं जातं की, या मंदिराच्या संपर्कात येताच माणूस असो वा प्राणी मरण पावतात. बर्‍याच वर्षांपासून ही जागा रहस्यमय ठिकाण आहे. कारण लोकांचा असा विश्वास होता की ग्रीक देवताच्या विषारी श्वासामुळे इथल्या लोकांचा मृत्यू होतो.

याठिकाणी वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे लोक या मंदिराच्या दाराला 'नरकाचे द्वार' म्हणू लागले. असे म्हणतात की ग्रीक आणि रोमन काळातसुद्धा मृत्यूच्या भीतीने लोक येथे जायला घाबरत असतं.

तथापि, लोकांच्या अनाकलनीय मृत्यूचे रहस्य शास्त्रज्ञांनी सोडविले आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की मंदिराच्या खालून सतत विषारी कार्बन डाय ऑक्साईड गॅस बाहेर पडत आहे, ज्यामुळे मनुष्य आणि प्राणी व पक्षी मरतात.

शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार मंदिराच्या खाली असलेल्या गुहेत मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वायू सापडला आहे. सामान्यत: फक्त १० टक्के कार्बन डाय ऑक्साईड कोणत्याही व्यक्तीला अवघ्या ३० मिनिटांत मारू शकतो, तर या गुहेत या विषारी वायूचे प्रमाण ९१ टक्के आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे गुहेच्या आतून निघणाऱ्या वायुमुळे किडे, प्राणी व पक्षीदेखील मरुन जातात.