जगातील सर्वात धोकादायक विमानतळ, लँडिंग करण्यापूर्वी वैमानिकांचाही हात कापतो..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 16:54 IST2024-12-29T16:41:24+5:302024-12-29T16:54:32+5:30
Most Dangerous Airport: आज सकाळी दक्षिण कोरियात भीषण विमान अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात 179 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Most Dangerous Airport in World: दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर आज सकाळी झालेल्या भीषण बिमान अपघातात जवळपास सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लँडिंगच्या वेळी विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान भिंतीवर आदळले अन् त्यात भीषण स्पोट झाला. या घटनेत विमानातील 179 प्रवासी जळून राख झाले. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा 5 विमानतळांबद्दल सांगणार आहोत, जिथे विमान उतरवताना अनुभवी पायलटचेही हात थरथर कापतात.
भूतानचे पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळ मानले जाते. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे विमानतळ 5,500 मीटर उंचीवर आहे. विमानतळावर एक 2,265 मीटर डांबरी धावपट्टी आणि एक टर्मिनल इमारत आहे. येथे फक्त दिवसा उड्डाणे होतात. या विमानतळावर उतरण्यासाठी वैमानिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.
नेपाळचे लुक्ला विमानतळ हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळ मानले जाते. 8000 फूट उंचीवर बांधलेल्या या विमानतळाचे नाव 2008 मध्ये बदलून तेनझिंग-हिलरी विमानतळ असे करण्यात आले. जोरदार वारा, थंड वातावरण आणि दृश्यमानता, ही येथे उतरण्यासाठी सर्वात मोठी आव्हाने आहेत. याशिवाय फ्लॅट टेकऑफ आणि लँडिंगसाठी याच धावपट्टीचा वापर करावा लागतो. धावपट्टी लहान असल्याने विमान डोंगरावर आदळण्याची शक्यता आहे.
प्रिन्सेस ज्युलियाना आंतरराष्ट्रीय विमानतळ, सेंट मार्टिन या कॅरिबियन बेटाचे मुख्य विमानतळ आहे. या ठिकाणी लँडिंग आणि टेकऑफच्या वेळी वैमानिकांचे हात थरथर कापतात. या विमानतळावरील धावपट्टीवर खूप लहान असल्यामुळे वैमानिकांना विशेष काळजी घ्यावी लागते.
ब्राझीलचे साओ पाउलो विमानतळ हे अत्यंत कमी लांबीची धावपट्टी असलेले विमानतळ आहे. कमी लांबी, अवघड अँगल आणि निसरड्या परिस्थितीमुळे हे अतिशय धोकादायक विमानतळ मानले जाते.
मडेरा विमानतळ क्रिस्टियानो रोनाल्डो आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. हे विमानतळ पोर्तुगालच्या मदेइरा बेटांवर आहे. या विमानतळावर सर्व वैमानिकांना उतरण्याची परवानगी नाही. येथे उतरण्यासाठी फार कमी वैमानिक प्रमाणित आहेत. येथील धावपट्टी ही जगातील सर्वात लहान धावपट्टी आहे.