Jara Hatke: चमत्कार! पर्वतामधून वाहू लागले दुधाचे झरे, पाहून ग्रामस्थांना बसला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 02:47 PM2021-08-22T14:47:06+5:302021-08-22T16:52:27+5:30

Jara Hatke News: हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील दुर्गम चौहार घाटीमध्ये पर्वतामधून सहा सात ठिकाणी झऱ्यामधून दुधासारखा पदार्थ वाहत आहे. हा पदार्थ एवढा स्वच्छ आहे की, काही अंतरावर जाऊन तो दह्याचे रूप घेत आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील दुर्गम चौहार घाटीमध्ये पर्वतामधून सहा सात ठिकाणी झऱ्यामधून दुधासारखा पदार्थ वाहत आहे. हा पदार्थ एवढा स्वच्छ आहे की, काही अंतरावर जाऊन तो दह्याचे रूप घेत आहे. चौहार घाटीमधील लोक नेहमीच आपली श्रद्धा आराध्य देव हुरंगू नारायणावर ठेवतात. त्यांच्यांसाठी हे दृष्ट कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही आहे.

चौहार घाटीमध्ये रोपा पंचायतीच्या दाडू गावात स्थानिक लोकांना हा प्रकार म्हणजे एक चमत्कारच वाटत आहे.

या चमत्काराची वार्ता घाटीमधील लोकांमध्ये आगीसारखी पसरली आहे. तसेच लोक आता दर्शनासाठी जात आहेत.

या गावापासून काही अंतरावर महादेवाचे स्थान आहे. तिथेसुद्धा एका पर्वतावर लहान लहान खड्डे बनलेले आहेत. तिथून खूप आधीपासून दुधासारखा पदार्थ वाहत असे.

त्या ठिकाणी खूप आधीपासून पूजा केली जाते. तसेच तिथे खिरीचा प्रसादही वाटला जातो.

तसेच महादेवाच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दाडू गावात सहा ते सात ठिकाणांवरून दुधासारखा पातळ पदार्थ वाहत आहे.

पर्वतावरून दूध वाहत असल्याचे रोपा गावातील एका व्यक्तीने पाच वर्षांपूर्वीच पाहिले होते. मात्र तेव्हा त्याने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले नव्हते.

आता पावसाळ्यामध्ये काही लोक या भागात मासे पकडण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी काही ठिकाणांवरून दुधासारखा पदार्थ वाहत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी याची माहिती इतरांना दिली.