लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दुसऱ्या पत्नीकडे जाऊन बसलाय पती, पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:14 PM2020-04-13T12:14:11+5:302020-04-13T12:36:38+5:30

मीडिया रिपोर्टनुसार, 40 वर्षीय पुरूषाला पहिल्या पत्नीकडून एक अपत्य आहे. दरम्यान त्याचं एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमप्रकरण जुळलं. ती महिला त्याची दुसरी पत्नी आहे.

देशातील लोकांना कोरोनामुळे घरांमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जास्तीत जास्त लोक घरातच आहेत. पण काही लोकांना या लॉकडाऊन दरम्यान कोणत्या घरात रहावं? असा प्रश्न पडला आहे

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीच्या पहिल्या पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याने तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घरात अडकला आहे.

पहिल्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार, कपड्यांचा व्यवसाय असलेल्या तिच्या पतीने करारातील नियम मोडला आहे. त्यामुळे पहिल्या पत्नीने बंगळुरूतील पोलिसांच्या महिला हेल्पलाईनवर फोन केला आणि पती घरी परत न आल्याची तक्रार दिली.

मीडिया रिपोर्टनुसार, 40 वर्षीय पुरूषाला पहिल्या पत्नीकडून एक अपत्य आहे. दरम्यान त्याचं एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमप्रकरण जुळलं. ती महिला त्याची दुसरी पत्नी आहे.

पहिल्या पत्नीला जेव्हा याबाबत कळालं तेव्हा त्याने स्वत:हून सांगितले की, त्याने दुसरं लग्न केलंय. नंतर हे प्रकरण पोलिसात गेलं होतं. (Image Credit : indiatimes.com)

पण या व्यक्तीने पहिल्या पत्नीला समजावलं आणि पोलिसांना यात आणू नको असं सांगितलं. (सांकेतिक छायाचित्र)

त्यानंतर पहिली पत्नी, दुसरी पत्नी आणि पतीकडील वयोवृद्धांनी यात हस्तक्षेप केला आणि ठरवलं की, पती दोन्ही पत्नींची काळजी घेईल, त्यांना हवं ते सगळं देईल आणि दोघींकडे एक-एक आठवडा थांबेल.

मात्र, लॉकडाऊन झाल्यापासून ही व्यक्ती दुसऱ्या पत्नीकडेच अडकून बसला. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला, पण तो पहिल्या पत्नीकडे गेलाच नाही.

आता पहिल्या पत्नीचं असं म्हणणं आहे की, घरातील खाण्याच्या सर्व वस्तू, भाजीपाला संपला. पतीने नियम मोडला आहे. त्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली आणि पतीला घरी येण्यास बजावले आहे.

पोलिसांनी याबाबत चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी अशी माहिती दिली की, ही व्यक्ती दुसऱ्या पत्नीच्या घरातून निघाली असून आता त्याच्या मित्राकडे राहत आहे. आता आपण हीच आशा करू शकतो की, त्याला तिसरी पत्नी असू नये.