शेकडो वर्ष बंद होतं हे भुयार, व्यक्तीने आत जाऊन पाहिलं तर झाला अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:22 AM2024-01-17T10:22:58+5:302024-01-17T10:30:08+5:30

जमिनीच्या 150 मीटर खाली त्याला 'खजिना' सापडला. एक असा खजिना ज्यामुळे त्याचं नशीब चमकलं आणि लोकांनाही एक वेगळं जग बघायला मिळालं.

पृथ्वीच्या गर्भात अनेक रहस्यमयी गोष्टी लपलेल्या असतात. जेव्हा लोक त्यांचा शोध लावतात तेव्हा चकीत करणारे खुलासे होतात. इटलीतील मॅपल्स शहरातही असंच काहीसं झालं. एक व्यक्ती त्याच्या घराजवळच्या खदाणी चेक करत होता. तेव्हाच त्याला एक बंद दरवाजा दिसला. हिंमत करून तो आत गेला तर बघून हैराण झाला. जमिनीच्या 150 मीटर खाली त्याला 'खजिना' सापडला. एक असा खजिना ज्यामुळे त्याचं नशीब चमकलं आणि लोकांनाही एक वेगळं जग बघायला मिळालं.

ही कहाणी इटलीतील मॅपल्स शहरातील आहे. सामान्यपणे येथील लोक आपल्या जुन्या घरांखाली रोमन खजिन्याचा शोध घेत असतात. त्यांना वाटतं त्यांना ऐतिहासिक खजिना सापडेल. येथील लोकांना या गोष्टी कॉमन आहेत कारण त्यांना अशा बऱ्याच गोष्टी सापडत राहतात.

पण 2012 मध्ये सरकारी अधिकारी काही भुयारांची पाहणी करत होते. तेव्हाच त्यांना एका व्यक्तीने याबाबत सांगितलं. पाहणी करत असताना एक भुयार दिसला जो शेकडो वर्षापासून बंद होता. त्यांना त्यात जे सापडलं ते हैराण करणारं होतं.

शेकडो वर्षापासून बंद या तळघरात त्यांना व्हिंटेज कार आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान वापरलेल्या अनेक वस्तूंचे अवशेष सापडले. इमारतीचा मलबा, जुने टीव्ही, रेफ्रिजरेटर, भंगार झालेल्या गाड्या आणि बाइक्स सापडल्या. चौकशी केल्यावर समजलं की, 1853 मध्ये सिसिलीचे तत्कालीन राजा बोरबॉन के फर्डिनेंड द्वितीयने ही इमारत बांधली होती. आज याला गॅलेरिया बोरबॉनिका नावाने ओळखलं जातं.

राजा बोरबॉनच्या एखाद्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी हे ठिकाण बांधलं होतं. कारण 1816 नंतर बोरबॉन शासनाविरोधात तीन युद्धे झाली होती. 1848 मध्ये फार हिंसक क्रांति झाली होती. क्रांतिकारकांनी 16 महिने राज्यावर ताबा मिळवला होता.

1849 सत्ता परत मिळाल्यावर फर्डिनेंड द्वितीयने घाईघाईत एक नवीन संविधान लिहिलं आणि पुन्हा विद्रोह झाला तर सुरक्षित पलायनाची योजना बनवली. त्यावेळीच या गुप्त ठिकाणाची कल्पना केली गेली. जेणेकरून रॉयल पॅलेसमधून पळून जाता यावं.

1930 च्या दशकात या भुयारांचा वापर जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी केला जाऊ लागला आणि मग हे ठिकाण विसरले. दुसऱ्या महायुद्धावेळी याचा वापर बॅरेक म्हणून करण्यात आला. विमान हल्ल्यातून वाचवण्यासाठी लोक इथे जाऊन लपत होते. पण 2012 मध्ये याबाबत तेव्हा समजलं जेव्हा दुसऱ्या महायुद्धावेळी यात राहिलेल्या टोनिनो पर्सिकोने एक भू-वैज्ञानिक जियानलुका मिनिनला संपर्क केला. त्यानंतर त्याचं नशीब बदललं. त्यांनी लोकांना एक नवीन विश्व दाखवलं.

जियानलुका त्यावेळी इतर भुयारांच्या खोदकामाचं नेतृत्व करत होते. जेणेकरून चेक करता यावं की, कुठे बॉम्ब तर नाही. कारण युद्धादरम्यान असे अनेक बॉम्ब लपवण्यात आले होते. जियानलुका आणि त्याच्या टिमला मलब्याची सफाई करण्यासाठी तीन वर्ष लागले. डिसेंबर 2015 मध्ये ही जागा एक संग्रहालय बनवण्यात आली.