ऐकावं ते नवलच! मांजरीमुळे बायको प्रेग्नंट झाल्याचा नवऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 04:12 PM2020-07-20T16:12:40+5:302020-07-20T16:23:49+5:30

पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मांजर तर अनेकांसाठी स्ट्रेसबस्टर असतं. त्यामुळे अनेक जण घरी मांजर पाळतात.

घरातले पाळीव प्राणी काहीवेळा घरातल्या व्यक्तींसाठी त्रासदायकदेखील ठरतात. एका दाम्पत्याला याचा अनुभव आला आहे. आपली पत्नी मांजरामुळे गर्भवती झाल्याचा आरोप एका व्यक्तीनं केला आहे.

एका व्यक्तीनं रेडइटवर त्याची व्यथा मांडली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या यामुळे आम्ही बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आधीच एका बाळाचे आई-वडील आहोत, असं त्या व्यक्तीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पत्नीसाठी पहिलं बाळंतपण अतिशय तणावपूर्ण ठरलं. त्यातून ती आता बाहेर येत आहे. त्यामुळे इतक्यात आई-बाबा व्हायचं नाही, असं आम्ही ठरवलं होतं. मात्र आमच्या मांजरानं सगळा घोळ घातला. त्यामुळे आता आम्हाला मनस्ताप होत आहे, असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बाळ नको नसल्यानं आम्ही कंडोम वापरण्याचा निर्णय घेतला. कारण माझी पत्नी पिल्समुळे आजारी पडते. मात्र कंडोम वापरूनही पत्नीला गर्भधारणा झाल्याचं व्यक्तीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

कंडोम वापरूनही पत्नी गर्भवती कशी राहिली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्तीनं सुरू केला. त्यावेळी बाथरुममध्ये असलेल्या ड्रॉवरमधील क्यू टिप्सचा डबा मांजरानं उघडल्याचं आणि त्यातील वस्तू इकडेतिकडे पसरवल्याचं लक्षात आलं.

काही क्यू टिप्स खराब झाल्यानं मी ते फेकून दिले. त्याजवळ असलेले कंडोम योग्य स्थितीत असल्याचं वाटल्यानं मी ते वापरले. त्यानंतर काही आठवड्यांमध्ये पत्नीला गर्भधारणेची लक्षणं आढळून आली. तिनं टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे दाम्पत्याला धक्का बसला.

पत्नी गर्भवती असल्याचं लक्षात येताच त्यानं घरात असलेले कंडोम तपासून पाहिले. त्या पॅकेटवर मांजराच्या दातांचे निशाण दिसले. यावरून घडलेला सगळा प्रकार दाम्पत्याच्या लक्षात आला.

Read in English