२४ वर्ष लहान मेलेनियाच्या प्रेमात कसे पडले ट्रम्प? जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:12 PM2020-02-25T12:12:53+5:302020-02-25T12:41:35+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारतीय दौऱ्यावर सध्या आहेत. ट्रम्प यांच्या सोबत भारतभेटीसाठी त्यांची मुलगी इवांका आणि मेलेनिया सुद्धा आली आहे. तुम्ही कालच्या ट्रम्प यांच्या भारत भेटीची अनेक दृश्य पाहिली असतील.

ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया या देखील प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सोबत होत्या. आज आम्ही तुम्हाला ट्रम्प आणि मेलेनिया यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत.

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांची लव्ह स्टोरी १९९८ मध्ये सुरू झाली. त्यावेळी ट्रम्प हे राजकारणात सक्रिय नव्हते. रियल इस्टेट व्यवसायासंबंधी त्यांची ओळख होती.

न्यूयॉर्क सीटी फॅशन वीक चालू असताना ट्रम्प यांना मेलेनिया यांच्यासोबत प्रेम झाले. ट्रम्प मेलेनियांना भेटण्याआधी त्यांची दोन लग्न झाली होती. दुसरी पत्नी मारला मेपल हिच्यासोबत त्यांचा घटस्फोट होणार होता.

एका पार्टीमध्ये ट्रम्प हे सेलिना मिडलफर्ट सोबत पोहोचत होते. त्याचवेळी पहिल्याचं नजरेत त्यांना मॉडेल मेलेनिया हिच्यावर प्रेम झालं. स्लोवेनियाईच्या सुंदर मॉडेल वर ट्रम्प यांची नजर खिळून राहिली. त्यानंतर यांचे रिलेशनशिप सुरू झाले.

त्याचवेळी मेलेनिया यांना सुद्धा ट्रम्प यांच्यावर प्रेम झालं. त्यानंतर या दोघांमध्ये फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. एका आठवड्यानंतर मेलेनिया ट्रम्प यांनी डोनाल्ट ट्रम्प यांना कॉल केल्यानंतर त्यांची पहिली डेट सुरू झाली.

त्यावेळी ट्रम्प आणि मेलेनिया एकमेकांना अधिकाधिक वेळ देऊ लागले होते. या दोघांच्या भेटी चर्चेच्या विषय ठरत होत्या. सन २००० मध्ये ट्रम्प यांना रिफॉर्म पार्टी कडून उमेदवारी देण्यात आली.

ट्रम्प यांना असं वाटत होतं की मेलेनियाने त्यांच्यासोबत अमेरिकेत यावं. मेलेनिया यांनी २००१ मध्ये ग्रीनकार्ड मिळवलं.

पाच वर्ष एकमेकांसोबत राहिल्यनंतर त्यांनी लग्न केलं. एप्रिल २००४ मध्ये त्यांनी लग्न केलं. मेलानियाला १.५ मिलियन डॉलरची डायमंड रिंग घालून लग्नाचा प्रस्ताव देण्यात आला. ट्रंम यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या यशस्वी होण्यामागे मेलेनिया यांचा खूप मोठा वाटा आहे.

२००५ मध्ये ट्रम्प आणि मेलेनिया यांचे लग्न झाले. हे लग्न नॉर्मल बीचवर झालं. त्यावेळी मेलेनियाने १ लाख डॉलरचा ड्रेस घातला होता. या लग्नात बिल गेट्स आणि हिलरी क्लिंटन सुद्धा सहभागी झाले होते.

आता ट्रम्प हे ६० वर्षांचे झाले आहेत आणि मेलेनिया यांनी आपल्या मुलाला जन्म दिला आहे. त्यावेळी इवांका ही १२ वर्षांची होती. २०१४ मध्ये ट्रम्प हे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.