भारतातील सर्वात लांब महामार्ग, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत 11 राज्यांमधून जातो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 01:16 PM2023-04-06T13:16:05+5:302023-04-06T13:29:00+5:30

longest highway in india : हा महामार्ग NH 44 पूर्वी NH 7 म्हणून ओळखला जात होता.

राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway- NH) जाळे भारतात विणलेले आहे. जे देशातील जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या शहरांना जोडते. आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील सर्वात लांब किंवा सर्वात मोठ्या महामार्गाबद्दल सांगणार आहोत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 (NH-44) देशातील 11 राज्यांमधून जातो. हा देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे. महामार्गाची एकूण लांबी सुमारे 3745 किलोमीटर आहे. हा महामार्ग देशातील 21 प्रमुख शहरांना जोडतो. हा महामार्ग NH 44 पूर्वी NH 7 म्हणून ओळखला जात होता.

हा महामार्ग तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून सुरू होऊन जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे संपतो. हा महामार्ग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमधून जाते.

देशातील सर्वात लांब महामार्गावर तुम्हाला भारताच्या समृद्ध संस्कृतीची झलक पहायला मिळते. यावरून तुम्हाला बर्फाच्छादित पर्वत ते कुरण, सुंदर जिल्हे आणि विहंगम दृश्ये पाहायला मिळतात.

राष्ट्रीय महामार्ग 44 वरील भारतातील पहिला underpass प्राण्यांसाठी बनवण्यात आला आहे. हे मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये आहे. याठिकाणी प्राणी पुलाखालून जातात आणि पुलावरून वाहने जातात. या पुलाची लांबी 750 मीटर आहे.

हा महामार्ग केवळ मोठी शहरेच नव्हे तर देशाच्या लांबी-रुंदीलाही जोडतो. हे महामार्ग ओळखणे सोपे जावे, यासाठी त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. बहुतेक राष्ट्रीय महामार्गांची देखभाल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे केली जाते.