इराणविरूद्धच्या युद्धामुळे थायलँडच्या ऑफिसेसमध्ये हाफ पँट - शर्टचा ड्रेस कोड, पाहा काय आहे यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 18:04 IST2026-03-14T17:48:05+5:302026-03-14T18:04:04+5:30

Thailand Office Dress Code While War : थायलँडमध्ये शूजची जाग सँडल आणि सूट - टायची जागा हाफ पँटने घेतलीये. हा काही नवीन फॅशन ट्रेंड नाही तर यामागे गंभीर कारण आहे.

Thailand Office Dress Code While War : युद्ध सामान्यपणे दोन देशांच्या सीमांवर होत असतं, पण त्याची झळ शेकडो मैल दूर असलेल्या सामान्य लोकांना कशी बसेल याचा काही नेम नाही. कारण युद्ध कुठेही सुरू असतो, त्याचा सगळीकडे परिणाम दिसून येतो. जसे की, आता तेल आणि गॅसची समस्या बघायला मिळते. पण थायलँडमध्ये एक वेगळ वेगळाच नजारा बघायला मिळतोय. थायलँडमध्ये शूजची जाग सँडल आणि सूट - टायची जागा हाफ पँटने घेतलीये. हा काही नवीन फॅशन ट्रेंड नाही तर यामागे गंभीर कारण आहे. वैश्विक ऊर्जा संकट आणि युद्धामुळे निर्माण होणाऱ्या विजेच्या टंचाईसोबत लढण्यासाठी थायलँडमध्ये हा नवा ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

थायलँडमध्ये वीज तयार करण्यासाठी भरपूर प्रमाणात नॅचरल गॅस लागतो आणि कच्चं तेलही लागतं. वेगवेगळ्या युद्धांमुळे आंतराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती आकाशाला भिडत आहेत आणि पुरवठाही खंडीत झाला आहे.

थायलँडमध्ये ऊर्जेचा इतका तुटवडा झाला आहे की, सरकारला वीज वाचवण्यासाठी कठोर नियम लागू करावे लागले आहेत. थायलँड हा एक उष्ण देश आहे, इथे ऑफिसेसमध्ये सगळ्यात जास्त वीज एअर कंडिशनसाठी खर्च होते.

याचाच विचार करून सरकारने एसीचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑफिसमध्ये फॉर्मल कपडे म्हणजे सूट, कोट आणि टाय घालणं ही एक परंपरा असते, पण विना एसी असे कपडे घालणं म्हणजे अवघड काम आहे.

जेव्हा सरकार ऑफिसमध्ये एसी बंद करण्याचा किंवा तापमान वाढवण्याचा आदेश देतं तेव्हा कर्मचाऱ्यांना गरमी सहन करणं अवघड होतं. यावर उपाय म्हणून हाफ पँट आणि टी - शर्ट घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हा हलका आणि आरामदायक ड्रेस कोड शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. ज्यामुळे कर्मचारी विना एसी कामावर लक्ष देऊ शकतात. थाई सरकारचं मत आहे की, जर ऑफिसमध्ये एसी तापमान केवळ १ ते २ डिग्री जरी वाढवलं तरी देशभरात कोट्यावधी यूनिट विजेची बचत होऊ शकते.

हाफ पँट आणि टी-शर्ट घातल्याने कर्मचाऱ्यांनी गरमी लागते, ज्यामुळे त्यांचा घामापासून आणि अस्वस्थतेपासून बचाव होतो. या छोट्या बदलाने वीज तर वाचेलच, सोबतच ऊर्जा संकटात ग्रिडवर पडणारा दबावही कमी होईल.