मोदीप्रेमींच्या लग्नाचं निमंत्रण, भाजपाला मत देण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:57 IST2019-01-28T19:50:22+5:302019-01-28T19:57:35+5:30

राहुल गांधींच्या अमेठीतील त्रिपाठीनामक मोदीप्रेमीनं चक्क भाजपाला मत हाच आमचा अहेर असेच लग्नपत्रिकेत छापलंय.
गुजरातमधील एका जोडप्यानं चक्क राफेल पुराणचं आपल्या पत्रिकेवर छापून राहुल गांधींना खोटारडं ठरवण्याचा प्रयत्न केलाय
31 डिसेंबर 2018 च्या प्रवीणकुमार यांच्या लग्नपत्रिकेत मोदींचा फोटो छापण्यात आलता, यातही मोदींना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंत
राजस्थानच्या एका मुस्लीम कुटुंबातील लग्नपत्रिकेत मोदींच्या स्वच्छ भारत उपक्रमाचे घोषवाक्य अन् चिन्ह छापले आहे.
निवडणुकांमध्ये प्रचारासाठी भन्नाट शक्कल लढविल्या जातात. पण जेव्हा लग्नाच्या आमंत्रणावरच चक्क मोदींचा फोटो छापला जातो, तेव्हा...
राजस्थानमधील आणखी एका जोडप्यानं भाजपाला मतदान देऊन मोदींना जिंकवण्याचं आवाहन केलंय.