कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:29 PM2021-10-25T17:29:05+5:302021-10-25T17:39:25+5:30

आपणा सर्वांना हे तर माहीत आहेच की, सोणं खाणीतून निघतं. पण तुम्ही कधी सर्वात जास्त सोनं काढलं जाणाऱ्या खाणीबाबत ऐकलंय का?

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जगातील सर्वात जास्त सोनं असलेल्या Nevada Gold Mine म्हणजे सोन्याच्या खाणीबााबत. काही रिपोर्ट्सनुसार इथून दरवर्षी दीड लाख किलोपेक्षा जास्त सोनं काढलं जातं. सोनं एक किंमती धातू आहे. जगभरात याचा वापर दागिने आणि सजावटीच्या वस्तूंसाठी केला जातो.

आपणा सर्वांना हे तर माहीत आहेच की, सोणं खाणीतून निघतं. पण तुम्ही कधी सर्वात जास्त सोनं काढलं जाणाऱ्या खाणीबाबत ऐकलंय का? जर नसेल ऐकलं तर आज जाणून घ्या. असं सांगितलं जातं की, Nevada च्या गोल्ड माइनमधून जगात सर्वात जास्त सोनं काढलं जातं.

या गोल्ड माइनमधून दरवर्षी लाखो किलो सोनं प्रोड्यूस होतं. जे नंतर जगभरातील देशात एक्सपोर्ट केलं जातं. Statista ने वर्ल्ड गोल्ड काउन्सिल डेटाच्या आधारावर एक लिस्ट तयार केली होती. ज्यात एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. Nevada च्या गोल्ड माइनमधून जगातलं सर्वात जास्त सोनं काढलं जातं.

ही खाण अमेरिकेतील Nevada शहरात स्थित आहे. या खाणीतून दरवर्षी १ लाख ७० हजार किलोपर्यंत सोनं काढलं जातं. अशात तुम्ही या गोष्टीचा अंदाज लावू शकता की, दरवर्षी या सोन्याच्या खाणीतून किती कोटी रूपयांचा फायदा होत असेल.

जर एक अंदाज लावला तर या गोल्ड माइनमधून दरवर्षी ६०० कोटी रूपयांचं सोनं काढलं जातं. अशात तुम्ही या खाणीच्या उपयोगीतेचा अंदाज लावू शकता. संयुक्त राज्य अमेरिकेच्या Nevada शहरात एक मोठ्या प्रमाणात सोन्याची मायनिंग केली जाते.

१८३५ पासून ते २०१७ पर्यंत Nevada मध्ये २०५,९३१,००० ट्रॉय औंस सोन्याचं उत्पादन करण्यात आलं. त्यासोबतच काही तज्ज्ञांनी संगितलं की, जगभरातील ५ टक्के याच ठिकाणी आहे.

Read in English