९५ टक्के लोकांना माहीत नसतो रेल्वेचा 'हा' एक खास नियम, वाचाल तर इतरांनाही सांगत सुटाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:12 IST2025-08-08T14:51:19+5:302025-08-08T15:12:08+5:30
Railway Ticket Checking Rule : रेल्वेत प्रवास करताना काळा कोट घातलेला तिकीट चेकर तर पाहिला असेलच. पण याच टीटीईबाबतच एक नियम अनेकांना माहीत नसतो.

Railway Ticket Checking Rule : भारतीय रेल्वेनं प्रवास करणं एक खूप वेगळा अनुभव असतो. स्वस्तात आणि कमी वेळेत हे रेल्वेचं वैशिष्ट्य. भरपूर लोक रोज रेल्वेनं प्रवास करतात. पण त्याना रेल्वेच्या अनेक महत्वाच्या नियमांबाबत माहीत नसतं. अशाच एका नियमाबाबत आपण आज पाहणार आहोत.
रेल्वेत प्रवास करताना काळा कोट घातलेला तिकीट चेकर तर पाहिला असेलच. पण याच टीटीईबाबतच एक नियम अनेकांना माहीत नसतो. रेल्वेचा एक असा नियम आहे की, एका ठराविक वेळेत आपल्याला झोपेतून उठवून टीटीई तिकीट दाखवा म्हणू शकत नाही.
रेल्वेच्या नियमाचा उद्देश प्रवाशांना लांब प्रवासादरम्यान आराम आणि पुरेशी झोप मिळावी हा असतो. लाखो लोक रोज स्लीपर आणि एसी कोचमधून लांबचा प्रवास करतात. जर मधेमधे तिकीट चेकिंगनं झोपमोड होत असेल तर कुणाच्याही जीवावर येईल. ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वेनं रात्रीच्या वेळी तिकीट चेकिंगवर बंदीचा नियम आणला आहे.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, रात्री १० वाजतानंतर आणि सकाळी ६ वाजताच्या आधी सामान्य स्थितींमध्ये तिकीट चेकिंग केली जात नाही. हा नियम स्लीपर आणि एसी दोन्ही प्रकारच्या कोचमध्ये लागू आहे. म्हणजे जर आपण आपल्या सीटवर बसले असाल आणि आपलं तिकीट चेक झालं असेल, तर रात्री आपल्याला कुणीही त्रास देणार नाही.
जर आपण प्रवासाच्या मधे रेल्वेत चढत असाल तर टीसीला तिकीट चेक करण्याचा अधिकार असतो. त्याशिवाय एखाद्या इमरजन्सीमध्ये तिकीट चेकिंग केलं जाऊ शकतं. पण आधीच बसलेल्या प्रवाशांना केवळ तिकीट चेक करण्यासाठी झोपेतून जागं करणं नियमाच्या विरूद्ध आहे.
जर कुणी टीसी रात्री १० वाजतानंतर पुन्हा पुन्हा तिकीट मागत असेल किंवा अनावश्यक त्रास देत असेल तर, रेल्वे हेल्पलाइन नंबर १३९ वर तक्रार करू शकता.
रेल्वेने प्रवाशांची झोप आणि आराम याबाबत आणखी काही नियम केले आहेत. जसे की, जोरजोरात बोलणं किंवा ओरडण्यास मनाई आहे, विना हेडफोन मोबाइलवर म्युझिक ऐकणं, व्हिडीओ बघण्यास मनाई आहे.