उष्णतेचा कहर! ही आहेत जगातील सर्वात 'हॉट' ठिकाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 03:34 PM2018-05-16T15:34:09+5:302018-05-16T15:34:09+5:30

दश्त-ए-लुत, इराण: हे जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. इथलं तापमान 70 अंश सेल्सिअसहून अधिक असतं. या ठिकाणी 2004 मध्ये 70 अंश सेल्सिअस, तर 2005 मध्ये 70.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया: बॅडलँड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या क्वीन्सलँडचा एक मोठा वाळवंटानं वेढला गेला आहे. 2003 मध्ये या ठिकाणी 69.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

फ्लेमिंगो माऊंटन, चीन: या भागाचा समावेश जगातील सर्वात उष्ण प्रदेशांमध्ये होतो. 2008 मध्ये या भागात 66.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

केव ऑफ द क्रिस्टल, मेक्सिको: मेक्सिकोमधील नैका येथील एका गुहेमधील तापमान 58 अंश सेल्सिअस इतकं आहे. गुहेतील हवा अतिशय उष्ण असल्यानं येथे कोणतंही संशोधनदेखील करता येत नाही.

अल-अजीजियाह, लीबिया: उन्हाळ्यात या भागातील तापमान 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. 1992 मध्ये इथलं तापमान तब्बल 57.8 अंश सेल्सिअसवर गेलं होतं.