एकाच वेळी तिघींना करत होता डेट, त्या तिघींनी केलं असं काही...की लोकं बोल्ले, वाहवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 09:45 PM2021-07-20T21:45:16+5:302021-07-20T21:58:28+5:30

कुणाला डेट करताना असे काही करू नका की त्यामुळे त्या व्यक्तीच्या भावना दुखावतील पण काही जण असे असतात ज्यांना इतरांच्या भावनांशी खेळण्याची सवयच असते. असाच एक तरुण एकाच वेळी तीन मुलींना डेट करत होता. त्यांनी असे काही केले जे पाहुन तुम्ही त्यांची वाहवा कराल...

बेकाह किंग, अ‍ॅबी रॉबर्ट्स, मॉर्गन टॅबोर या तीन मुलींना समजलं की ती ज्या मुलाला डेट करत आहेत तो एकच आहे.

त्यांना हे समजताच त्या तिघींनीही त्याला सोडून दिले आणि प्लॅन बनवला तो पिकनिकचा.

पहिलं अॅबीने या दोघींना ती डेट करत असलेल्या मुलाविषयी सांगितलं आणि मग त्यांना समजलं की त्या एकाच मुलाल डेट करत आहेत.

त्यानंतर असंही समोर आलं कि हा अशा आणखी तीन म्हणजे एकुण सहा जणींशी एकाचवेळी डेट करत होता. त्या उरलेल्या तीन जणींनी त्याच्याशी ब्रेक अप केले.

मग बेकाह, अॅबी आणि मॉर्गन तिघी चांगल्या मैत्रीणी झाल्या आणि त्यांनी ट्रिपचा प्लॅन करण्याचे ठरविले.

त्या तिघींना त्यांच्याच देशाचा पश्चिम भाग संपूर्ण फिरुन घेण्याचे निश्चित केले.

यासाठी त्यांनी त्यांच्या मैत्रीला सेलिब्रेट करण्यासाठी बॅम बस नावाचे इन्स्टापेज तयार केले.

त्यांच्या या ट्रिपची खासियत म्हणजे त्यांनी ३० वर्ष जुन्या स्कुलबसमधुन फिरण्याचे ठरविले.

त्या म्हणतात, अनेकांना असं वाटतंय की आम्ही हे आमच्या एक्सला जळवण्यासाठी करतोय.

पण तसं नाही आम्ही हे आमच्या आनंदासाठी करतोय. आम्ही आमची स्वप्न जगतोय.