मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा चमकदार दगड पाहून वैज्ञानिक हैराण, पण लाल ग्रहावर हिरवा दगड आला कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 11:13 AM2021-04-07T11:13:24+5:302021-04-07T11:20:59+5:30

या रहस्यमयी हिरव्या रंगाच्या दगडाचं सत्य अजून समोर आलेलं नाही. हा कुठून आलाय हे कळलं नाही. तो कशापासून तयार झाला हेही समजू शकलेलं नाही.

मंगळ ग्रह हा लाल रंगाचा आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तेथील मातीही लाल आहे. दगडांचा रंगही लाल रंगाशी मिळता-जुळता आहे. अचानक तिथे एक हिरव्या रंगाचा चमकदार दगड आढळल्याने NASA चे वैज्ञानिक अवाक् झाले आहेत. त्यांना हे कळत नाहीये की, अखेर लाल ग्रहावर हा हिरव्या रंगाच दगड आला कुठून? नासाच्या मार्स पर्सिवरेंस रोवरला हा दगड दिसला.

या रहस्यमयी हिरव्या रंगाच्या दगडाचं सत्य अजून समोर आलेलं नाही. हा कुठून आलाय हे कळलं नाही. तो कशापासून तयार झाला हेही समजू शकलेलं नाही. पण यात छोटी छोटी छिद्र आहेत आणि मधे मधे चमकदार हिरव्या रंगाच्या क्रिस्टलसारखी वस्तू आहेत. यावर प्रकाश पडल्यावर ते चमकतात.

नासाच्या पर्सिवरें रोवरने आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहिले आहे की, इंजीन्यूटी हेलिकॉप्टर मंगळ ग्रहावर उतरवल्यानंतर आमच्या टीमला हा दगड आढळून आला. याचे फोटो वेगवेगळ्या कॅमेराने घेण्यात आले. सध्या आमच्याकडे याबाबत केवळ अंदाज आहेत. जोपर्यंत रोवर टेस्ट करत नाही तोपर्यंत स्पष्ट होणार नाही.

नासाचे वैज्ञानिक हैराण आहेत की, हा दगड जर मंगळ ग्रहाच्या लोकल बेडरॉकचा भाग आहे तर मग याचा रंग असा कसा? एकतर हा दुसऱ्या ग्रहावरून इथे आलाय किंवा एखाद्या उल्कापिंडाचा तुकडा आहे. पण हे आत्ताच स्पष्ट सांगता येत नाही.

हा दगड साधारण ६ इंच म्हणजे १५ सेंटीमीटर लांब आहे. जवळून पाहिलं तर यावर लेजर मार्क दिसतात. हा दगड एकदा सुपरकॅमने स्कॅन करण्याचा प्रयत्न झाला आहे. तेव्हा समजलं की, या दगडात चमकदार हिरवे क्रिस्टल आहे. जे चमकतात.

परीक्षणानंतरच वैज्ञानिक हे सांगू शकतील की, हा दगड मंगळ ग्रहावरील आहे की नाही. हा दगड उल्कापिंडही असू शकतो. ज्याला नासाच्य क्यूरियोसिटी रोवरने २०१४ मध्ये पाहिलं होतं.

नासाच्या मार्स पर्सिवरेंस रोवरने मंगळ ग्रहावर १८ फेब्रुवारीला उतरला होता. याचा उद्देश आहे खतरनाक जेजेरो क्रेटरमध्ये प्राचीन जीवाचा शोध घेणं. असे मानले जाते की, क्रेटरमध्ये आधी सरोवर आणि नद्या होत्या. हा एक मोठ्या डेल्टाचा भाग होता.

जेजेरो क्रेटरमध्ये मार्स पर्सिवरेंस रोवरला स्टडी करण्यासाठी फार जास्त सॅम्पल आणि उदाहरणे मिळणार आहे. ज्यातील एक हा हिरव्या रंगाचा दगड आहे.

मार्स पर्सिववरेंस रोवरवर सात सायन्स इन्स्ट्रूमेंट आहेत ज्यात सुपरकॅम सर्वात वर आहे. हा २३ फुटाच्या अंतरापर्यंत असलेल्या कोणत्याही दगडावर लेजर मारू शकतो. याने त्या दगडातील केमिकल कंपोजिशनची माहिती मिळेल.

२ मार्चला सुपरकॅमने मंगळ ग्रहावर माज नावाच्या दगडावर लेजर शॉट मारला होता. नासाने जेजेरो क्रेटरच्या त्या भागाचं नाव NAVAJO ठेवलं आहे. जिथे ते रोवर उतरलं आहे