जगातलं सर्वोत्तम रेस्टॉरंट पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 14:49 IST2019-06-27T14:44:28+5:302019-06-27T14:49:20+5:30

फ्रान्समधील मिराझर रेस्टॉरंटला जगातील सर्वोत्तम रेस्टॉरंट ठरलं आहे.

अर्जेंटिनाचा शेफ मॉरो कोलेग्रेकोनं मिराझर रेस्टॉरंटची उभारणी केली आहे.

समुद्र, डोंगर यांच्यापासून प्रेरणा घेऊन मिराझरची उभारणी करण्यात आली.

मिराझरनं अव्वल स्थान पटकावताना डेन्मार्क आणि स्पेनमधील प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं.

मिराझर रेस्टॉरंट अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. समुद्राच्या साक्षीनं आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद इथे अनुभवता येतो.

मिराझर रेस्टॉरंट डोंगराच्या अगदी शेजारी आहे. त्यामुळे निसर्गाच्या जवळ राहण्याचा अनुभव मिराझरमध्ये घेता येतो.

ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा उद्देश ठेवून मिराझरची उभारणी करताना विशेष काळजी घेण्यात आली.