शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात आहे एक रहस्यमयी चर्च जे फक्त उन्हाळ्यातच दिसते, याला तरंगणार चर्च असंही म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 6:44 PM

1 / 10
आपल्या देशात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, या ठिकाणां संबधीच्या कथा, इतिहास आणि त्यांची रचना लोकांना आश्चर्यचकीत करतात.
2 / 10
भारतात असेच एक रहस्यमयी चर्च आहे. पावसाळ्यामध्ये हे चर्च संपूर्ण पाण्याच्या खाली जाते, आणि उन्हाळयामध्ये ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळते.
3 / 10
हे चर्च कर्नाटकातील हसनपासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेल्या शेट्टीहल्ली रोझरी येथे स्थित आहे. तेथील स्थानिक लोक या चर्चला बुडणारे चर्च किंवा तरंगते चर्च म्हणून ओळखतात.
4 / 10
सध्या हे चर्च भग्नावस्थेत आहे, तरीही त्याचे बांधकाम पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की हे चर्च उत्तम कलाकृतीचा एक अद्भूत नमुना आहे.
5 / 10
हे चर्च १८६० मध्ये फ्रेंच मिशनऱ्यांनी बांधले होते. नंतर १९६० च्या दशकात,येथे गोरूर जलाशय बांधण्यात आले, जेणेकरून हेमवती नदीचे पाणी अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल.
6 / 10
परंतु त्यानंतर या चर्चच्या आसपासची जमीन वालुकामय झाली आणि हळूहळू ही जागा निर्मनुष्य झाली.
7 / 10
या चर्चच्या आसपासची जागा आता जवळपास वर्षभर पाण्यात बुडाली आहे. म्हणूनच हे चर्च खूप खास आहे.
8 / 10
जर तुम्ही पावसाळ्यात येथे गेलात तर फक्त एक तृतीयांश चॅपल म्हणजेच (लहान चर्च) दिसू शकते.
9 / 10
रोझरी चर्चमध्ये आता एक गूढ आकर्षण आहे झाले आहे. आता हे चर्च पक्ष्यांचे घर झाले आहे.
10 / 10
या चर्चचे नवीन नाव 'द ड्रॉऊनिंग' चर्च ठेवण्यात आले आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKarnatakकर्नाटक