जिमचा प्रभाव बघण्यासाठी महिलेने अंतर्वस्त्रात काढले फोटो, चुकून जिम ट्रेनरला पाठवले आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 10:25 IST2021-06-01T10:00:26+5:302021-06-01T10:25:36+5:30
हिलने सांगितलं की, ट्रेनरने मला सांगितलं की तू तुझ्या अंडरगारमेंट्समध्ये फोटो काढ. जेणेकरून तुला कळेल की, तुझ्या ट्रान्फॉर्मेशनच्या आधी आणि नंतर कशी दिसत होती.

इंग्लंडच्या एका महिलेने आपल्या जिम ट्रेनरसोबत झालेल्या कन्फ्यूजमुळे एक चूक केली आणि तिला लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागला. गेमा हिल नावाच्या या महिलेने आपल्या टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून २० हजार फालोअर्सना तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला.

बर्मिंघमच्या हार्ट वेस्ट मिडलॅंड्सची रेडीओ प्रेझेंटर हिल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. ती या व्हिडीओत म्हणाली की, मी नुकताच माझी फिटनेस वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी एक ट्रेनर ठेवला होता आणि मी पहिल्यांदाच जिममध्ये एखाद्या ट्रेनरची मदत घेत होते.

हिलने सांगितलं की, ट्रेनरने मला सांगितलं की तू तुझ्या अंडरगारमेंट्समध्ये फोटो काढ. जेणेकरून तुला कळेल की, तुझ्या ट्रान्फॉर्मेशनच्या आधी आणि नंतर कशी दिसत होती. सोबतच तू किती वजन कमी केलं हेही समजेल आणि बॉडी ट्रान्फॉर्मेशननंतर किती बदल झाला हेही समजेल.

तिने आपल्या व्हिडीओत पुढे सांगितले की, ट्रेनर मला म्हणाला की, श्वास रोखून ठेवू नको. ना चांगल्या अॅंगलने फोटो काढण्याचा प्रयत्न करूस. तुम्ही फक्त इमानदारीने फोटो क्लीक करा. जेणेकरून शरीरात होणारे बदल तुम्हाला समजू शकतील.

गेमा हिलने ट्रेनरने सांगितलं तसंच केलं आणि अंडरगारमेंट्समध्ये काही फोटो क्लिक केले. हे फोटो तिने तिच्या ट्रेनरला पाठवले. पण त्यावर ट्रेनरचा आलेला मेसेज पाहून हिल हैराण झाली. गेमा हिल म्हणाली की, मला ट्रेनरचा मेसेज आला आणि मला त्याने लिहून पाठवले की, हे फोटो मला पाठवायचे नव्हते.

ट्रेनरने मेसेज लिहिला होता की, हे फोटो क्लिक करून तुम्हाला तुमच्याजवळच ठेवायचे होते. मी कोणत्याही क्लाएंटला त्यांचे फोटो मला पाठवण्यासाठी सांगत नाही. तुझे फोटो पाहून माझी गर्लफ्रेन्ड मला हे कुणाचे फोटो आहेत म्हणून विचारत आहे.

तेच ट्रेनरचा मेसेज वाचून ती हैराण झाली आणि म्हणाली की, सॉरी मला समजण्यात जरा कन्फ्यूजन झालं. मला फारच विचित्र वाटत आहे. आता गेमाने सांगितलेल्या या किस्स्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी हा किस्सा फनी असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी ट्रेनरच्या इमानदारीचं कौतुक केलं आहे. आता गेमा जिम ट्रेनरचा सामना कसा करते याचा प्रश्न अनेकांना पडला आहे.



















