दुबईतील सगळ्यात महागडं घर विक्रीला, किंमत वाचून डोकं चक्रावून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 09:46 AM2023-06-16T09:46:21+5:302023-06-16T09:52:48+5:30

Dubais Most Expensive House : हे महालासारखं घर तयार करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली आणि 2018 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं होतं.

Dubais Most Expensive House On Sale : जगभरात दुबई आपल्या आकाशाला भिडणाऱ्या इमारतींसाठी प्रसिद्ध आहे.

येथील घरांच्या किंमतीही नेहमीच चर्चेचा विषय असतात. अशात आता दुबईतील सगळ्यात महागडं घर मार्बल पॅलेस विकलं जाणार आहे.

या घराला मार्बल पॅलेस असं नाव देण्यात आलं कारण हे घर इटलीमधील दगड आणि जवळपास 7 लाख सोन्याच्या पत्र्यांपासून तयार करण्यात आलं होतं.

या आलिशान हवेलीमध्ये 5 बेडरूम, 19 बाथरूम, 15 कारसाठी गॅरेज, इनडोर आणि आउटडोर पूल, अॅक्वेरिअम, एक पॉवर सबस्टेशन आणि पॅनिक रूम आहे.

तसेच हे घर 19व्या आणि 20व्या शतकातील मूर्ती व पेंटींगने सजवण्यात आलं आहे. या घराची किंमत 1 हजार 675 कोटी रूपये आहे.

मार्बल पॅलेस अमीरात हिल्सच्या शेजारी 60 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलं आहे. पण यात केवळ पाच बेडरूम आहेत. हे घरा सध्या सगळ्यात महागडं घर ठरलं आहे.

हे महालासारखं घर तयार करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली आणि 2018 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं होतं.

घराचा मालक एक स्थानिक प्रॉपर्टी डेव्हलपर आहे. ज्याने नाव न छापण्याची विनंती केली आहे. Luxhabitat Sotheby चे ब्रोकर कुणाल सिंह म्हणाले की, जगात साधारण 5 ते 10 संभावित खरेदीदार आहेत जे मार्बल पॅलेस खरेदी करू शकतात. अमीरात हिल्स एक गेटेड समुदाय आहे जो जवळपास 20 वर्षाआधी बनवण्यात आला होता.