खाण्या-पिण्यांच्या वस्तुंसारखी अणुबॉम्बला सु्द्धा एक्सपायरी डेट असते का, एकदा बनवला तर किती वर्ष टिकतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:36 IST2026-03-11T15:07:53+5:302026-03-11T15:36:27+5:30
Nuclear Bomb Expiry Date : जगातील सगळ्यात घातक शस्त्रांची एक्सपायरी डेट असते का? जर एकदा अण्वस्त्र म्हणजे अणुबॉम्ब बनवले तर ते नेहमीसाठी कामात येतात का?

Nuclear Bomb Expiry Date : रोजच्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी, औषधे किंवा रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपण खरेदी करतो तेव्हा त्यांची एक्सपायरी डेट चेक करतो. कारण प्रत्येक गोष्ट टिकण्याचा किंवा चांगली राहण्याचा एक कालावधी असतो. जर एक्सपायर झालेले पदार्थ खाल्ले, औषधं खाल्लीत तर तब्येत बिघडेल आणि वस्तू वापरल्या तर हवं ते काम योग्यपणे होणार नाही. पण मग असेही प्रश्न पडतात की, जगातील सगळ्यात घातक शस्त्रांची एक्सपायरी डेट असते का? जर एकदा अण्वस्त्र म्हणजे अणुबॉम्ब बनवले तर ते नेहमीसाठी कामात येतात का? किंवा काळानुसार त्यांची शक्ती कमी होते का? चला जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं...

अणुबॉम्बला एक्सपायरी डेट असते का?
सामान्यपणे लोकांना असं वाटतं की, न्यूक्लीअर बॉम्ब म्हणजेच अणुबॉम्ब एकदा बनवल्यानंतर तो नेहमीसाठी तेवढाच घातक राहतो. पण सत्य काही वेगळंच आहे. अणुबॉम्बची एक्सपायरी डेट ही काही खाद्य पदार्थ, दूध किंवा औषधांसारखी नसते. पण या बॉम्बच्या क्षमतेचा एक कालावधी नक्कीच असतो. म्हणजे एका काळानंतर हा बॉम्ब आधीसारख्या क्षमतेने काम करत नाही. त्याची स्फोटाची क्षमता कमी होऊ शकते.

एक अणुबॉम्ब किती वर्ष टिकतो?
काही रिपोर्टनुसार, एक अणुबॉम्ब सामान्यपणे ३० ते ५० वर्षांपर्यंत प्रभावी मानला जातो. त्यानंतर त्याच्या आतील लावण्यात आलेल्या बऱ्याच गोष्टी हळूहळू डॅमेज होऊ लागतात. मात्र, त्यातील यूरेनिअम किंवा प्लूटोनिअमसारखे तत्व हजारो वर्षांपर्यंत टिकून राहतात. पण बॉम्बची क्षमता केवळ याच गोष्टींवर अवलंबून राहत नाही.

ट्रिटिअम आणि इतर घटकांची भूमिका
आताच्या आधुनिक न्यूक्लीअर बॉम्बमध्ये ट्रिटिअम नावाचं एक खास तत्व वापरलं जातं. जे स्फोटाची शक्ती वाढवण्यास मदत करतं. ट्रिटिअमचं अर्ध आयुष्य जवळपास १२ वर्ष असतं. याचा अर्थ असा होतो की, दर १२ वर्षात याचं प्रमाण अर्ध होत राहतं. जर हे वेळीच बदललं नाही तर बॉम्बेची क्षमता कमी होऊ शकते आणि तो योग्यपणे काम करू शकणार नाही.

अणुबॉम्ब केवळ किरणोत्सर्गी धातु नसतात, तर त्यांमध्ये अनेक किचकट इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, डिटोनेटर आणि सुरक्षा उपकरणं देखील असतात. काळानुसार इलेक्ट्रॉनिक पार्ट्स बेकार होतात. जुने झालेले सर्किट, सेन्सर आणि तार बॉम्बेला भयावह बनवू शकता. त्यामुळे ते नियमितपणे बदलले जातात.

जुने बॉम्ब फेकले जातात का?
अजिबात नाही...कधीच अणुशक्ती असलेले देश जुने अणुबॉम्ब असेच सोडू शकत नाहीत. ते वेळोवेळी मेन्टेन केले जाता, अपग्रेड केले जातात किंवा पूर्णपणे निष्क्रिय केले जातात. ज्यामुळे ते कुणासाठीही धोकादायक ठरत नाहीत. अनेक देशांमध्ये जुने अण्वस्त्र खोलून त्यांचे उपयोगी पार्ट्स नव्या शस्त्रात लावले जातात.

















